वृद्धाला कुटुंबीयांच्या ताब्यात देताना जरीपटका पोलिस वृद्धाला कुटुंबीयांच्या ताब्यात देताना जरीपटका पोलिस
नागपूर

पोलिसांनी जपला माणुसकीचा धर्म; वृद्धाला मिळवून दिले कुटुंब

अनिल कांबळे

नागपूर : शिस्तप्रिय पोलिस खात्यात नोकरी करताना खाकीचा दम दाखविल्याशिवाय गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण होत नाही. परंतु, खाकी वर्दीच्या आत असलेल्या पोलिसालाही मन असते. पोलिसही माणुसकीचा धर्म पाळत सामाजिक बांधिलकी जपतात. जरीपटका पोलिसांनी खाकी वर्दीतील भावनांचा ओलावा दाखवत बेपत्ता झालेल्या एका ८० वर्षीय वृद्धाचा शोध घेऊन त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. या कामगिरीमुळे जरीपटका पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पोलिस नियंत्रण कक्षातून जरीपटका पोलिसांना फोन येतो. सरस्वती लॉनजवळ ८० वर्षीय वृद्ध बेशुद्धावस्थेत पडलेला असल्याची माहिती मिळते. जरीपटक्याचे ठाणेदार वैभव जाधव लगेच अलर्ट होतात. ते लगेच तीन पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन सरस्वस्ती लॉनजवळ पोचतात. बेशुद्धावस्थेत पडलेल्या वृद्धाला सावलीत नेतात. तेथे चेहऱ्यावर पाणी शिंपडून त्यांना जागे करतात. तीन ते चार दिवसांपासून ते उपाशी असल्याचे लक्षात येताच लगेच ग्लुकोज देतात. त्यामुळे वृद्ध शुद्धीवर येतात. लगेच दोन कर्मचाऱ्यांना पाठवून जेवण बोलावतात. पूर्णपणे शुद्धीवर आल्यानंतर वृद्धाने बाबूलाल चंद्रसेन आहके (वय ८०, रा. झिंगाबाई टाकळी, मानकापूर) असे नाव सांगितले. परंतु, पत्ता सांगता येत नव्हता.

सोशल मीडियाचा आधार

पीआय वैभव जाधव यांनी लगेच बाबूलाल यांचा फोटो परीसरातील काही व्हॉट्सॲप युजर्सला दिला. तसेच पोलिस कर्मचारी विजय भलावी, सचिन, रेहान यांनी वृद्धाच्या कुटुंबीयांचा शोधाशोध सुरू केली. सोशल मीडियाचा आधार घेतल्यामुळे बाबूलाल यांच्या कुटुंबीयांचा शोध लागला. त्यांचा मुलगा गेल्या तीन दिवसांपासून वडिलांचा शोध घेत होता. त्यांना माहिती देण्यात आली. ते जरीपटका पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी बाबूलाल यांची मुलाशी भेट करून दिली. मुलाने वडिलांना घट्ट मिठी मारली आणि ठाणेदार आणि पोलिसांचे आभार मानले. यावेळी उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. जरीपटका पोलिसांच्या या कामगिरीचे शहरभर कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Rajapur Tragedy : नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच घरातील ४ भावंडे बुडाली; तिघांचे मृतदेह हाती

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT