remdesivir
remdesivir Team Esakal
नागपूर

'मेडिकल-मेयो'तील रेमडेसिव्हिर संपले, चार दिवसांपासून नातेवाईकांच्या हाती प्रीस्किप्शन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपुरात रेमडेसिव्हिरचा तुटवडा असल्याचे दिसून येते. त्यातच सर्रास काळाबाजार सुरू असून, आता मेडिकल आणि मेयोतील गरीब रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. मागील चार दिवसांपासून पुरवठादार कंपनीला आदेश दिले आहेत; परंतु पुरवठा होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. रेमडेसिव्हिर उपलब्ध नसल्याने मेयो आणि मेडिकलमधील डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांच्या हाती प्रीस्क्रिप्शन देत आहेत.

रेमडेसिव्हिरचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला असावा, असे मेडिकलमधील तज्ज्ञ खासगीत सांगताहेत. चढ्या खरेदीने रेमडेसिव्हिर सहज उपलब्ध होत आहे. मात्र, मेडिकल, मेयोतील रुग्णाकंडे कोणाचेही लक्ष नाही. मागील चार दिवसांपासून मेडिकल, मेयोत रेमडेसिव्हिर इंजेक्शन नाही. तरीही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल दिसत नाही. जिल्हाधिकारी यांनी दखल घेतल्यास तत्काळ मेयो-मेडिकलला रेमडेसिव्हिरचा साठा मिळू शकतो. परंतु, अधिकारी केवळ बैठकांमध्ये गुंतले आहेत. जागतिक आरोग्य संघटना व आयसीएमआरच्या निकषानुसार गंभीर संवर्गातील विशिष्ट निकष असलेल्या रुग्णांना उपचाराचा भाग म्हणून रेमडेसिव्हिर दिले जाते. चार दिवसांपासून दोन्ही रुग्णालयांत रुग्णांना रेमडेसिव्हिरचे इंजेक्शन दिले नसल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाईकांनी केली. प्रशासनाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्‍ह नातेवाईकांनी उपस्थित केले. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, नाव न टाकण्याच्या अटीवर त्यांनी रेमडेसिव्हिर संपले असल्याची माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT