पारशिवनीः पेंच धरणाची दारे उघडून सोडण्यात आलेले पाणी.
पारशिवनीः पेंच धरणाची दारे उघडून सोडण्यात आलेले पाणी. 
नागपूर

पेंच, कन्हान नदीकाठावरील रहिवाशांनो सावधान, पेंच धरणाचे सहा गेट उघडले...

वसंत डामरे

रामटेक/पारशिवनी (जि.नागपूर)   :   जिल्हयात रविवारपासून पावसाने संततधार लावल्याने पेंच धरण ९६ टक्के भरले. त्यामुळे सोमवारी सकाळी दोन तर दुपारपर्यंत आणखी ४ असे एकूण ६ गेट उघडण्यात आलेत. प्रशासनाने नदीकाठावरील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. येत्या दोन दिवसात तोतलाडोह धरणाचेही गेट उघडण्याची शक्यता सिंचन विभागाचे  उपविभागीय अभियंता राजेश राठोड यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  : सहारा देता येत नसेल तर देऊ नका, पण तिरस्कार तरी करु नका हो...

प्रशासनाचे परिस्थितीवर लक्ष
रामटेक उपविभागात दोन मोठी धरणे आहेत. त्यापैकी पेंच धरणात ९६ टक्के जलसाठा झाल्याने सोमवारी सकाळी ८.१५ वाजता धरणाचे २ गेट ०.३ मिटरने उघडण्यात आले. दुपारपर्यंत पाण्याची आवक चांगली असल्याने आणखी ४ गेट असे एकूण ६ गेट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पेंच धरणातून १९०.१०४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पेंच व कन्हान नदीकाठावरील रहिवाशांना सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. याच पेंच नदीवर तोतलाडोह हे आंतरराज्यीय धरण असून महाराष्र्ट व मध्यप्रदेश सिमेवर हे धरण बांधण्यात आले आहे.

अधिक वाचा : कोविडमधून परतला, खूनप्रकरणात अडकला; दोन अधिकाऱ्यासह चार पोलिस पॉझिटिव्ह

येत्या काही दिवसात पेंचचे सर्वच गेट उघडणार
तोतलाडोह धरणात सोमवारी ४८८.७८ मीटर पाण्याची पातळी असून जलसाठा ९२३.४६१ दशलक्षघनमीटर आहे. सद्यस्थितीला धरणात ९१ टक्के जलसाठा असून आणखी २ ते ३ टक्के जलसाठा वाढल्यास तोतलाडोह धरणाचे गेट उघडण्याची शक्यता सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता राजेश राठोड यांनी व्यक्त केली. याच तोतलाडोह धरणाच्या वरच्या बाजूस मध्यप्रदेश शासनाने चौराई धरण बांधले आहे. या धरणात सध्या ७९ टक्के जलसाठा आहे. आजघडीला मध्यप्रदेशात पाऊस सुरू आहे. त्यामुळे चौराई धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ होईल. त्यावेळी चौराई धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात येईल. पर्यायाने तोतलाडोह धरणात पाण्याची आवक वाढून तोतलाडोहचे गेट येत्या दोन दिवसात उघडण्याची शक्यता सिंचन विभागाने व्यक्त केली आहे. याच तोतलाडोह धरणातील पाणी पेंच धरणात येते. त्यामुळे येत्या काही दिवसात पेंचचे सर्वच गेट उघडण्याची  शक्यता आहे.

अधिक वाचा  :  ‘यापुढे वीज बिलासाठी आत्महत्या झाल्यास सरकारसोबत संघर्ष’; कोणत्या मोठ्या नेत्याने केले हे वक्तव्य, वाचा सविस्तर

असा करण्यात आला पाण्याचा विसर्ग
पारशिवनीः धरणाला एकूण सोळा दरवाजे आहेत. रविवारी सकाळी ८.१५ वाजता दोन दरवाजे ०.३ मीटरने उघडण्यात आले. त्यानंतर दुपारी १.२५ वाजता दोन दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर पुन्हा ६.३० वाजता दोन दरवाजे उघडण्यात आले. प्रत्येक दरवाजा ०.३ मीटरने उघडण्यात आला आहे. प्रत्येक दरवाज्यातून ३१.६८ क्यूसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे . एकूण सहा गेटमधून १९०.१ क्यूमेक प्रति सेकंड पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

 
संपादन  : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT