nagpur sakal
नागपूर

Nagpur : महालात रिद्धी-सिद्धी प्रकटल्या

केळीबाग रस्त्याचे रुंदीकरण प्राचीन मंदिरे आली दृष्टीक्षेपात

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अतिक्रमण तसेच कालाघौत सुमारे तीनशे वर्षांचा इतिहास लाभलेले शहरातील अनेक वारसास्थळे व प्राचीन मंदिरे केळीबाग रोडच्या रुंदीकरणामुळे दृष्टीक्षेपात आली आहेत. यात भोसलेकालीन रिद्धी-सिद्धी, मुरलीधर, महादेव व महालक्ष्मी मदिरांचा समावेश असून हा समृद्ध वारसा आता जतन करण्याची गरज आहे. भोसलेकाळात महाल हीच प्रमुख वसाहत होती. मुख्य बाजारपेठ येथेच होती. कालांतराने येथील व्यावसायिकांनी अतिक्रमण करून व्यवसाय वाढवणे सुरू केले. काही मंदिरे ताब्यात घेऊन त्यावर कब्जा केला.

अनेक वास्तू अधिकृत बांधकामात दाबून टाकल्या. टिनाने शेड टाकल्याने हा वारसा झाकोळला होता. त्यामुळे केळीबाग रोड अरुंद झाला होता. येथील वर्दळीमुळे या रोडवर वाहनाने प्रवास करणेही अवघड झाले होते. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी काही वर्षांपूर्वी केळीबाग रोडच्या रुंदीकरणाचा संकल्प केला. यास येथील व्यापाऱ्यांनी प्रचंड विरोध केला, आंदोलने केली, न्यायालयात गेले. मात्र त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत अतिक्रमण काढले जात आहे. पक्की अनधिकृत बांधकामे पाडल्या जात आहेत. त्यामुळे केळीबाग रोडवरचे ऐतिहासिक व प्राचीन वैभव पुन्हा नागरिकांच्या दृष्टिक्षेपात आले आहे.

यात कोतवाली पोलिस ठाण्याच्या संरक्षक भिंतीला लागून एक रिद्धी-सिद्धी गणेश मंदिर, तर विरुद्ध दिशेला मुरलीधर हे पुरातन मंदिराचा समावेश आहे. ही दोन्ही मंदिरे अवतीभोवतीच्या दुकानांमुळे वेढली गेली होती. याशिवाय दुमजली दुकानांच्या विळख्यात अडकलेले भोसलेकालीन मुरलीधर मंदिर, महादेव मंदिर, महालक्ष्मी मंदिर, शिरपूरकर राममंदिर, जैन मंदिर आता मोकळी करण्यात आले आहेत.

गणेश आणि मुरलीधर मंदिर मंदिरे ऐतिहासिक असून, हेरिटेज श्रेणीत मोडतात. ही मंदिरे जवळपास पाऊणे तीनशे वर्ष जुनी असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. बाकाबाईचा वाडा अर्थात सध्याचे कोतवाली पोलिस ठाणे हे या मंदिराला लागून आहे. याशिवाय परिसरात शेकडो वर्ष जुनी एक बावडी विहीर आहे. ज्यात गुप्त दरवाजा असल्याचे काही ज्येष्ठ नागरिक सांगतात. या मंदिराच्या समोर असलेल्या काळ्या दगडांनी तयार केलेले मुरलीधर मंदिर आहे. मंदिराच्या चारी बाजूंनी सुबक असे कोरीव काम करण्यात आले आहे. अनेक मूर्ती दगडात कोरण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : कोल्हापुरात खासगी बसला भीषण आग; आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT