नागपूर

RTE Admission: आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुहूर्ताची प्रतीक्षा! जानेवारी उजाडला तरी अद्याप प्रक्रियेस प्रारंभ नाही

एरवी डिसेंबर महिन्यातच प्रारंभ होणारी आरटीई प्रवेश प्रक्रिया यंदा नवीन वर्ष जानेवारी महिन्याचा तिसरा आठवडा उजाडला तरीही शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राबविल्या जाणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त सापडला नाही.

सकाळ डिजिटल टीम

RTE Entrance Procedure: एरवी डिसेंबर महिन्यातच प्रारंभ होणारी आरटीई प्रवेश प्रक्रिया यंदा नवीन वर्ष जानेवारी महिन्याचा तिसरा आठवडा उजाडला तरीही शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राबविल्या जाणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे यंदा राज्य शासनाला आरटीई प्रवेश प्रक्रियेचा विसर पडला आहे की काय ० असा प्रश्न पालकांना पडला आहे.


राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी पाठवलेल्या प्रस्तावावर अद्याप शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे २०२४- २५ या शैक्षणिक वर्षातील आरटीई प्रवेश प्रक्रिया रखडल्याचे चित्र आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दूर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील आरटीईच्या २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिला जातो.

राज्यभरातील लाखो पालक आरटीई प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत आहेत. राज्यातील शाळांमध्ये आरटीईच्या सुमारे ९० हजार ते १ लाख जागांसाठी तब्बल तीन ते साडेतीन लाख विद्यार्थी अर्ज करतात. दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास कोणत्या ना कोणत्या कारणामुळे विलंब होतो.

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील प्रवेश प्रक्रिया साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातच सुरू होते. त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे राहतो.
राज्य शासनातर्फे पंजाब व कर्नाटक राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा विचार केला जात होता. परंतु, त्यास आता उशीर झाला आहे. राज्य शासनाच्या परवानगीशिवाय शालेय शिक्षण विभागाला आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करता येत नाही. (Latest Marathi News)

शालेय शिक्षण विभागाने त्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. परंतु, अद्याप शासनाकडून त्यास मान्यता दिली गेली नसल्याची माहिती आहे. परिणामी शाळा नोंदणी, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक, आवश्यक कागदपत्रांची माहिती पालकांना देणे यासह एकूण प्रवेश प्रक्रिया राबविण्यात विलंब होत आहे.

शाळांना प्रतिपूर्तीची रक्कम मिळता मिळेना
आरटीईच्या विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम राज्य शासनाकडून शाळांना वेळेवर दिली जात नाही. त्यामुळे दरवर्षी शालेय शिक्षण विभाग व शाळा प्रशासन यांच्यात संघर्ष होतो. शुल्क प्रतिकृतीची रक्कम मिळत नाही. तोपर्यंत आरटीईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही, अशी भूमिका शाळांकडून घेतली जाते. यावर्षी इंग्रजी माध्यमाच्या शाळा कोणती भूमिका घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

गत वर्षी ३५६ जागा होत्या रिक्त
वर्धा जिल्ह्यात आरटीईच्या गत २०२३-२०२४ या शैक्षणिक सत्रात १११ शाळांत एक हजार १११ जागा उपलब्ध होत्या. या जागांकरिता ४,९८६ पालकांनी ऑनलाइन अर्ज केला. त्यापैकी १,१११ जागांकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यापैकी ७५५ प्रवेश निश्चित करण्यात आले. तर ३५६ जागा रिक्तच राहिल्या होत्या. यंदा मात्र अद्याप प्रवेशाची तारीख निश्चित झाली नसल्याने पालक प्रतीक्षेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT