वानाडोंगरीः श्री गणेशाच्या मूर्तीवरून शेवटचा हात फिरविताना. 
नागपूर

विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या मूर्तीचे वाढलेत भाव, हे आहे कारण...

विजयकुमार राऊत

नागपूर ग्रामीणः सुखकर्ता-दुःखहर्ता श्री गणरायाचे आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. २२ ऑगष्टला श्री गणेश चतुर्थी असून त्यादिवशी गणराज विराजमान होतील. त्यादृष्टीने सगळीकडे तयारी सुरू आहे.  बाजारात गणेशाच्या मातीच्या आकर्षक  मूर्त्या विक्रीस आल्या आहेत. परंतू यंदा सर्व सणांवर कोरोनाचे सावट असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे बाजारात यावर्षी पाहिजे तशी गर्दी दिसून येत नाही. कच्च्या मालाचेही दर वाढल्यामुळे मूर्त्यांचेही भावही भरमसाठ वाढले असल्याचे मूर्ती तयार करणारे कलाकार सांगतात.

अधिक वाचाः तरुणांनो, जीव इतका स्वस्त झालाय का? मृत्यूच्या दोन घटनांनी हादरली उपराजधानी

कोरोना महामारीचे संकट
महाराष्ट्रतील घरोघरात सुखकर्ता गणेशराय विराजमान होतात. दहा दिवसाच्या काळात घरोघरी धार्मिक आणि चैतन्याचे वातावरण असते. श्री गणेश चतुर्थीला विधिवत गणपतींची स्थापना केली जाते.  परंतू यंदा कोरोना ही महामारी असल्यामुळे प्रत्येक सणावर या महामारीचे सावट पसरलेले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा बाजारात मूर्ती खरेदी करण्याकरीता फारशी गर्दी दिसून येत नसल्यामुळे  मूर्ती तयार करणाऱ्या कलावंतांनाही कोरोनाचा फटका बसत आहे. वानाडोंगरी येथील मूर्तिकार विष्णू राऊत हे मूर्ती महाग होण्याची कारणे सांगताना म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांपासून मी हा व्यवसाय करीत असून यंदा मात्र या  व्यवसायाला कोरोनामुळे अवकळा आलेली आहे. यावर्षी सुरवातीला कोरोनामुळे लॉकडाउन लागल्यामुळे लॉकडाउनचा फटका संपूर्ण मूर्तिकारांना बसला असल्याचे ते म्हणाले.

अधिक वाचाः कोरोनाचा हाहाकार! नागुरात १६ दिवसात तब्बल ३३९ रुग्णांचा मृत्यू.. आज तब्बल इतक्या रुग्णांची नोंद.. वाचा

कुटुंबाच्या उदरनिर्वाहापुरतेच उत्पन्न
मूर्त्या तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल महागल्यामुळे त्याचा प्रभाव सहाजिकच मूर्त्यांच्या किमतीवर पडतो. जसे की मूर्ती तयार करण्यासाठी उच्च प्रतिची मातीचा आवश्‍यकता असल्यामुळे  ती माती आम्हाला दुसरीकडून बोलवावी लागते. त्या  मातीचे भाव यंदा मोठ्या प्रमाणात वाढले. गणपती बाप्पाची मूर्ती तयार करण्यासाठी लाकडी पाट्या लागतात. त्या लाकडाचे दर वाढले. कलरचे रंग दहापट वाढले. त्यामुळे  मूर्त्याचेही भाव वाढले. केवळ गणपतीच्या  बाबतीतच नव्हे तर  कान्होबा, दुर्गा,  शारदा देवींच्या मूर्त्याचेही दर वाढले आहेत. गणपती बनविण्याचे काम आम्ही ३ महिन्यांपूर्वीपासून सुरू करतो. या कामी आमचे अख्खे कुटूंब दिवसरात्र मूर्त्या बनविण्यासाठी खपते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असल्याचे  मूर्तीकार विष्णू राऊत सांगतात. वडीलांचा वारसा जोपासत असलेले विष्णू राऊत मात्र मुलांना या व्यवसायात उतरविण्यात अनुत्सुक आहेत. मुलांनी खूप शिकावे, प्रगती करावी, परंतू या व्यवसायात पडू नये, असं ते सांगतात.     
संपादनः विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT