Nagpur Hit and Run Case sakal
नागपूर

Nagpur Hit and Run Case : रितू मालूची न्यायालयीन कोठडीत रवानगी,मर्सिडिज कार अपघात प्रकरण : सीआयडीकडून मध्यरात्री अटक

Nagpur Hit and Run Case : रामझुला पुलावर मर्सिडीज कारने दोन युवकांना उडवल्याच्या प्रकरणात रितू मालूला सीआयडीने मध्यरात्री अटक केली असून न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रामझुला पुलावर मर्सिडिज कारने दोघांना उडविल्याच्या प्रकरणात रितिका उर्फ रितू मालूचा जामीन सत्र न्यायालयाने रद्द केला होता. दरम्यान तपास अधिकाऱ्यांना अटकेची मुभा देण्यात आली.

त्यानुसार, रितू मालू हिला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी (सीआयडी) मध्यरात्री अटक केली. गुरुवारी (ता.२६) तिला सत्र न्यायालयासमोर सादर केल्यावर न्यायालयाने तिची पोलिस कोठडी फेटाळून लावत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या रामझुला हिट अँड रन अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला होता. तहसील पोलिसांचा तपास निष्पक्ष नसल्याने अपघातातील मृतकांच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात तपास सीयआडीकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने ही मागणी मान्य करीत तपास तहसील पोलिसांकडून काढून घेतला होता. कुठल्याही तपास प्रक्रियेत पुरावे गोळा करणे महत्त्वाचे असते. मात्र तहसील पोलिसांनी असे केले नसल्याचे दिसत आहे.

फौजदारी गुन्ह्यांचा निष्पक्ष तपास हे पोलिसांचे कर्तव्य आहे. मात्र, या प्रकरणात असे झाले नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले होते. दरम्यान मालूचा जामीन रद्द करा, असा तहसील पोलिसांचा अर्ज सत्र न्यायालयापुढे प्रलंबित होता. बुधवारी याप्रकरणी निकाल सुनावत सत्र न्यायालयाने सीआयडीचा अर्ज मान्य केला. त्यानुसार रितू मालू हिला सीआयडीने अटक केली.

गुरुवारी उशिरा रितूला जिल्हा सत्र न्यायालयात सादर केल्यावर न्यायालयाने गुन्हा किरकोळ असो किंवा गंभीर असो, कोणत्याही गुन्ह्यात आरोपीला एकदा ताब्यात घेतल्यावर पुन्हा पोलिस कोठडीची मागणी करायची असल्यास ती पंधरा दिवसांत करावी लागते. या गुन्ह्यात मालूला २५ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर कलम ३०४ (ए) ऐवजी ३०४ हे कलम दाखल करण्यात आले. मात्र, ते याच गुन्ह्यात असून हा नवा गुन्हा नाही. त्यामुळे तिला पोलिस कोठडीत पाठविता येणार नसल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

असा आहे घटनाक्रम

  • रामझुला परिसरात २५ फेब्रुवारीला मद्यधुंद असलेल्या रितू मालू हिने आपल्या मर्सिडिज कारने मोहम्मद गुलाम मुस्तफा आणि मोहम्मद आतिक या दोन युवकांना उडवले व पळ काढला. यात या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला होता.

  • ७ मार्चला तपास अधिकाऱ्यांनी जामीन रद्द करण्यासाठी अर्ज केला होता. ३ एप्रिलला तो अर्ज फेटाळला होता.

  • याप्रकरणी उशिरा गुन्हा दाखल करीत, तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी क्लबसह इतर ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून १५ एप्रिलला कार जप्त केली.

  • २५ मे रोजी पोलिसांनी कार मानकापूर येथील गॅरेजमधून जप्त केली. त्यानंतर रितू मालू या फरार होत्या.

  • १ जुलैला रितूने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्यांना कोतवाली येथे ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जामीन मिळाला होता.

  • त्यानंतर आतिकचा भाऊ शाहरूख झिया मोहम्मद याने प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे मागणी केली होती. त्यानुसार प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT