Hatia Pune Express sakal
नागपूर

Nagpur Crime : तृतियपंथीयांच्या वेशात आलेल्या दरोडेखोरांची प्रवाशांना मारहाण; पुणे-हटीया एक्सप्रेसमध्ये लुटपाट

तृतियपंथीयांच्या वेशात आलेल्या दरोडेखोरांनी प्रवाशांना मारहाण करून जवळपास ३० ते ४० प्रवाशांकडून प्रत्येकी पाचशे रुपये वसूल केले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - तृतियपंथीयांच्या वेशात आलेल्या दरोडेखोरांनी प्रवाशांना मारहाण करून जवळपास ३० ते ४० प्रवाशांकडून प्रत्येकी पाचशे रुपये वसूल केले. ही घटना मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास पुणे-हटीया एक्सप्रेसमध्ये घडली. पोलिसांनी पीडित प्रवाशांचा व्हिडीओ तयार करून घटनेसंदर्भात माहिती घेतली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी फिर्यादी राजेशकुमार याचे बयान नोंदविले. त्याच्या तक्रारीवरून दरोड्याचा गुन्हा नोंदविला.

राजेश कुमार (२२) रा. आयसी चौक असे फिर्यादी प्रवाशाचे नाव आहे. राजेश हा मागच्या जनरल कोचने पुणे ते नागपूर असा प्रवास करीत होता. या डब्यात जवळपास ७० प्रवासी असतील. मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास गाडी वर्धा रेल्वे स्थानकावर असताना सहा लोक स्लिपर डब्यात चढले. चार साडी घालून तर दोघे जिन्स पॅन्टवर होते. ते सर्व तृतियपंथीयांच्या वेशभूषेत होते.

गाडी नागपूरच्या दिशेने निघाली. गाडीने गती घेतल्यानंतर तृतियपंथीयांनी स्लीपर डब्यातून जनरल बोगीत प्रवेश केला. प्रवाशांना मारपीट करण्यास सुरूवात केली. प्रत्येकाला पाचशे रुपये मागितले. ज्यांनी दिले नाही त्यांना मारहाण करीत होते. मारहाणीच्या भीतीने जवळपास ३० ते ४० प्रवाशांनी पाचशे रुपये त्यांना दिले. सर्व रक्कम गोळा केल्यानंतर अजनी स्टेशनच्या आधी गाडीची गती कमी झाल्यावर सहाही तृतियपंथी पळून गेले.

दरम्यान एका प्रवाशाने या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. गाडी येण्यापूर्वीच आरपीएफ जवान फलाटावर तयार होते. गाडी जवळपास १.५०वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर आली. भयभीत झालेल्या प्रवाशांनी सामुहिकरित्या आपबीती सांगितली. पोलिसांनी त्यांचा व्हिडीओ तयार केला. या वेळी राजेंद्र सिंग नावाचा पीडित प्रवासीही होता.

राजेशकुमारची आँखो देखी

राजेशकुमार हा मुळचा बिहारचा रहिवासी आहे. तो कामाच्या शोधात नागपुरात आला. मागील काही महिण्यांपासून तो एमआयडीसी येथील जलाराज कंपनीत काम करतो. ३१ डिसेंबरला दोन कामगारांना घेवून पुण्याला गेला. कंत्राटदारांकडे दोन कामगारांना सोडल्यानंतर पुणे-हटिया एक्सप्रेसने नागपूरसाठी निघाला, त्याने ही ऑखो देखी सांगितली.

दोघांना घेतले ताब्यात

पुणे-हटिया या प्रकरणात गुन्हा दाखल करून कायदेशिर कारवाई करीत आहोत. या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती लोहमार्ग पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी दिली.

तृतियपंथीयांची धरपकड

लोहमार्ग पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांच्या पथकाने ठिकठिकाणाहून तृतियपंथीयांना ताब्यात घेतले. सखोल चौकशी करून आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. न्यायालयात हजर करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत तृतियपंथीयांची धरपकड आणि चौकशी सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT