file photo 
नागपूर

कोरोनाच्या संकटकाळात ई-कॉमर्स कंपन्यांनी घेतली ही भूमिका...मग

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोट्यवधीचा व्यवसाय करीत पारंपरिक व्यवसायाला अडचण ठरत असलेल्या ई-कॉमर्स कंपन्यांनी कोरोनाच्या उद्भवलेल्या जागतिक आणि राष्ट्रीय संकटकाळात आपल्या पोर्टलचे संचालन थांबविले आहे. या संकटात आर्थिक मदतीचा हात पुढे करण्याऐवजी कंपन्या बेपत्ता झाल्या आहेत.

तसेच देशाच्या नागरिकांच्या अत्यावश्‍यक सेवाही पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत. संकटकाळात ई-कॉमर्स पोर्टलची अशी वागणूक निंदणीय आहे.

अशा कठीणप्रसंगी वाणिज्य वर्गांनी आपली जबाबदारी पार पाडून देशाच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे. पण संकटात ई-कॉमर्स कंपन्याची भूमिका चुकीची आहे, असा आरोप अखिल भारतीय किकोळ व्यापारी महासंघाचे (कॅट) राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी केला आहे.

ई-कॉमर्स कंपन्यांनी पोर्टल बंद करणे दुर्भाग्यपूर्ण

लोकांना मदतीची गरज असताना ई-कॉमर्स कंपन्यांनी पोर्टल बंद करणे दुर्भाग्यपूर्ण आहे. अशा संकटकाळात व्यवसाय करणे या कंपन्यांना फायद्याचे वाटत नाही. पण अपार संसाधन असलेले ई-वाणिज्य पोर्टल किरकोळ विक्रेत्यांचा व्यवसाय संपुष्टात आणण्यासाठी वर्षभर प्रयत्न करतात. पण आता ते पूर्णपणे अज्ञातवासात गेले आहेत. देशावर आलेल्या संकटकाळात त्यांच्या पोर्टलची नितांत गरज आहे. संकटकाळात मित्र आणि शत्रूची खरी ओळख लोकांना झाली आहे.

जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा

देशात आवश्‍यक वस्तूंच्या वितरणात व्यापाऱ्यांच्या भूमिकेची भरतीया यांनी प्रशंसा केली. सर्व अडचणींवर मात करीत आणि कोरोनामुळे संक्रमित होण्याची शक्‍यता असतानाही व्यापारी स्वत:ला संकटात टाकून देशात जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा योग्यरीत्या करीत आहेत. देशात आवश्‍यक वस्तूंचा व्यापार करणाऱ्या जवळपास 1.25 कोटी व्यावसायिकांमध्ये लॉकडाउनचे प्रतिबंध आणि अन्य अडचणीनंतरही 25 टक्के व्यापारी आवश्‍यक वस्तूंचा पुरवठा करीत आहेत. कोरोनामुळे देशातील व्यवसाय सध्या अनिश्‍चित आहे.

पंतप्रधानांना लिहिले पत्र

गेल्या काही दिवसांमध्ये देशातील किरकोळ व्यवसायात दरदिवशी जवळपास 15 हजार कोटींच्या व्यवसायाचा तोटा होत आहे. भारतात जवळपास सात कोटी व्यापाऱ्यांपैकी जवळपास 6.5 कोटी व्यापाऱ्यांनी लॉकडाउनमुळे आपला व्यापार बंद केला आहे. अशा व्यापाऱ्यांसाठी एक विशेष आर्थिक पॅकेजची मागणी पंतप्रधानांकडे पत्र लिहून केली आहे. व्यापाऱ्यांना पॅकेज मिळाल्यास कोरोना महामारीचा ते दृढतेने सामना करतील, असे भरतीया म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स सहावे जेतेपद पटकावणार का? एक गोष्ट जी वाढवू शकते टेंशन, जाणून घ्या त्यांची बेस्ट Playing XI

Share Market Trading: शून्य ब्रोकरेज की १००% लोभ? 'मोफत' ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सचे धक्कादायक वास्तव; गुंतवणुकीआधी नक्की वाचा

'साईबाबा मला दिसले...' संकर्षण कऱ्हाडे साईचरणी नतमस्तक, अनुभव सांगताना म्हणाला...

Ram Navami: राम नवमीला एक नाही तर चक्क दोन सार्वजनिक सुट्ट्या; योगींनी का घेतला हा निर्णय ?

पुन्हा भेटू... स्टार प्रवाहची आणखी एक मालिका घेतेय निरोप; शेवटच्या भागाचं शूट संपलं, शेअर केले फोटो

SCROLL FOR NEXT