Rose Garden in Yellow, Summer Fruit, Black Lady and so much more ... Once upon a time 
नागपूर

रोझ गार्डनमध्ये पिवळा, समर फलो,ब्लॅक लेडी आणि कितीतरी... बघाच एकदा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिकेच्या उद्यान विभागाने महापौर संदीप जोशी, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर कंत्राटदाराला दिलेल्या इशाऱ्यानंतर शहरातील उद्यानात हिरवळ दिसून येत आहे. पूर्व नागपुरातील उद्यानात 'रोझ गार्डन' आकार घेत असून बहरलेल्या गुलाबांमुळे नागरिकांची संख्याही वाढत आहे.

नागरिकांना उत्तम आरोग्य लाभावे आणि प्रदुषणरहित प्राणवायू मिळावा यासाठी महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील सर्व उद्यानांमध्ये दुरुस्ती व देखभालीचे निर्देश उद्यान विभागाला दिले आहेत. शहरातील 126 उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीची पालिकेवर जबाबदारी आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसोबतच अन्य नागरिकांच्या दृष्टीने शहरातील उद्याने महत्त्वाची आहेत. दररोज हजारो नागरिक सकाळ, संध्याकाळ उद्यानात व्यायामासाठी आणि फिरण्यासाठी येतात. शारीरिक आणि मानसिक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी या उद्यानांचा उपयोग होत आहे. महापौर संदीप जोशी यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुरू केलेल्या 'वॉक ऍन्ड टॉक विथ मेयर' या उपक्रमांतून नागरिकांनी उद्यानांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले होते. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही उद्यानांची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी पूर्व नागपुरातील भारत माता-डॉ. आंबेडकर उद्यानात 'रोझ गार्डन' विकसित करण्याचा आदेश दिला आहे. तेथे पिवळा गुलाब, समर फ्लो, डबल डिलाईट, फस्ट प्राईज, ब्लैक लेडी आदी गुलाबाचे रोपटे लावण्यात आले आहेत. येथे तीन ग्रीन जीम आहेत. मुलांसाठी खेळाचे साहित्य आहे. दररोज सुमारे एक हजारांवर नागरिक तेथे येत असून त्यांनीही आनंद व्यक्त केला.

वर्दळ वाढली

महापौर आणि आयुक्तांच्या आदेशानंतर उद्यान अधिक्षक अमोल चौरपगार यांनी युद्धस्तरावर उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीला प्रारंभ केला. त्यांनी उद्यानातील लॉन, बालकांसाठी असलेले खेळण्याचे साहित्य, ग्रीन जीम आणि बसण्यासाठी असलेले बाकांवर लक्ष केंद्रित केले. उद्यानातील रंगबिरंगी कारंजेही सुरू करण्यात येत आहेत. उद्यान विभागाच्या प्रयत्नामुळे नागरिकांची सकाळी व सायंकाळी उद्यानात वर्दळ वाढल्याचे चित्र आहे. उद्यानांच्या देखरेखीसाठी नियुक्त कंत्राटदारांना देखभाल योग्यप्रकारे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात कुचराई झाल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांना देण्यात आल्याने उद्यानांत चांगले परिणाम दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

IPL 2026, RR vs CSK: राजस्थानच्या तिखट माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज हतबल; पण ओव्हर्टनच्या खेळीनं १२० धावा पार

Punjab Mail : ११४ वर्षांची परंपरा जपत ‘पंजाब मेल’ नव्या रूपात रुळांवर

SCROLL FOR NEXT