Rotten death body found in train car
Rotten death body found in train car 
नागपूर

रेल्वे डब्यात आढळला कुजलेला मृतदेह, आता पोलिसांसमोर हे मोठे आव्हान 

योगेश बरवड

नागपूर : रेल्वेच्या डब्यात कुजलेला मृतदेह आढळून आल्याने बुधवारी नागपूर रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. मृतदेह पूर्णतः कुजलेला होता, त्यामुळे सर्वत्र दुर्गंध पसरली होती. मृतदेहाची अवस्था लक्षात घेता तातडीने मोक्षधाम येथे तातडीने दफनविधी करण्यात आला.

मृताची ओळख पटू शकली नाही. तो अंदाजे ५० वर्षे वयोगटातील असावा. सुमारे महिनाभरापूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज बांधला जात आहे. ही घटना हत्या, आत्महत्या की आजारपणामुळे मृत्यूचे हे वैद्यकीय अहवाल व पोलिस तपासातून निष्पन्न होईल. तूर्तास लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनही सज्ज आहे. उपाययोजना म्हणून रेल्वे प्रशासनाने कोरोना संशयितांवर उपयारासाठी रेल्वेचे डबे तयार ठेवले आहेत. हे डबे कमी पडल्यास अतिरिक्त १५ डबे आरक्षित ठेवण्यात आले असून, सर्व नागपूर रेल्वे स्थानकाच्या यार्डात ठेवले आहेत. 

बुधवारी सकाळी डबे स्वच्छतेसाठी वॉशिंग यार्डात आणण्यात आले असता प्रचंड दुर्गंधी पसरली. रेल्वे कर्मचाऱ्यांना संशय येताच घटनेची माहिती आरपीएफ नियंत्रण कक्षाला देण्यात आली. नियंत्रण कक्षाकडून अजनी येथील लोहमार्ग पोलिस मुख्यालयाला कळविण्यात आले. अमृतसर रेल्वेच्या (कोच नंबर १३२२३) बर्थ क्रमांक ४९ ते ५६ च्या खाली मृतदेह आढळला. 

मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याचे दिसताच लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. रेल्वे डॉक्टांनी मृत घोषित करताच लोहमार्ग पोलिसांनी पंचनामा करून मोक्षधाम घाटावर दफनविधी उरकला. हेडकॉन्स्टेबल ऑज्वेल थॉमस प्रकरणाचा तपास करीत आहेत. मृताची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे. 

संपादन : अतुल मांगे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 phase 4 Election Voting LIVE : लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा; सकाळी नऊ वाजेपर्यंत राज्यात 6.45% मतदान

Lok Sabha Voting: मतदानाला सुरुवात होताच EVM मध्ये बिघाड, पुण्यासह, संभाजीनगरमध्ये मतदार खोळंबले

VIDEO: अन् अनुष्कानं थेट हात जोडले; आरसीबी मॅच जिंकताच विरुष्काचं हटके सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

SBI Hiring: स्टेट बँक देणार हजारो नोकऱ्या! 3,000हून अधिक नवीन शाखा उघडण्याची बँकेची योजना

Chinese Spy: सायकलवरुन प्रवेश, मोबाईलमध्ये धक्कादायक फोटो अन्... गुप्तहेर असल्याचा संशय, चिनी नागरिक अटकेत

SCROLL FOR NEXT