social media roumers
social media roumers 
नागपूर

नागपुरातील आठ वस्ती ब्लॅकलिस्टमध्ये असल्याची अफवा 

सकाळवृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीतील आठ वस्तींचा काळ्या यादीत समावेश करण्यात आला आहे. तेथे लष्कर तैनात करण्यात येणार असून, लाठीचार्ज व रबरी गोळ्यांचा वापर करण्यात येणार असल्याची अफवा पसरविणाऱ्या मोबाइलधारकाविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास हा मॅसेज व्हॉट्‌सऍपवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.

मोमीनपुरा, शांतीनगर, पिवळीनदी, जाफरनगर, गांधीबाग, ताजबाग, कामठी व हसनबाग आदी भाग काळ्या यादीत टाकण्यात आले आहेत. या भागांमध्ये जवान तैनात करण्यात येणार असून, ते विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर लाठीचार्ज व रबरी गोळ्या झाडतील, असा मजकूर या मॅसेजमध्ये होता.

अफवा पसरविणाऱ्या मोबाइलधारकाविरुद्ध गुन्हा 
एका मोबाइलधारकाने हा मॅसेज पोलिस नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर पाठविला. पोलिस नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक श्रावण बागुल यांनी सदर पोलिसांत तक्रार दिली. सदर पोलिसांनी अनोळखी मोबाइलधारकाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा व आदेशाची अवहेलना केल्याचा गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT