संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
नागपूर

संघ स्वंयसेवकाच्या माणुसकीला सलाम...पतीने सोडलेल्या महिलेची घेतो सख्या आईसारखी काळजी

राघवेंद्र टोकेकर

नागपूर : कोरोना महामारी आणि त्यात लॉकडाउनमुळे अनेकांचे जीवनचक्रच बदलून गेले आहे. कधी नव्हे अशा संकटाचा सामना ते करीत आहे. दुष्काळात तेरावा महिना अशी त्यांची स्थिती झाली आहे. नागपुरातील रमाई ही या संकटात सापडलेल्या अनेकांपैकी एक. बेरोजगारी आणि त्यात लॉकडाउनचे संकट अशा विचित्र स्थितीत सापडलेल्या रमाईच्या मदतीला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा एक स्वंयसेवक देवदूतासारखा धावून आला आणि रमाईला जगण्याचे बळ मिळाले. सख्या आईप्रमाणे हा देवदूत त्या रमाईची काळजी घेत आहे.

कोरोनामुळे कुणाचा रोजगार गेला तर अनेकांचे रोजच्या जेवणाचे हाल झाले. अशा वेळी देशात विविध सेवाकार्यांच्या माध्यमातून गरजुंपर्यंत पोहचणाऱ्या संघ स्वयंसेवकांनी तीन कोटी गरजुंना मदतीचा हात दिला आहे. निराधाराची समस्या सोडविण्याचा प्रत्येक स्वयंसेवकाचा प्रयत्न आहे. नागपुरातील सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या रमाईची अडचण सोडविण्याचा प्रयत्न या स्वंयसेवकांनी केला आहे. त्यांच्यासाठी संघस्वयंसेवकाची कर्तव्यनिष्ठा जीवनदान ठरली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असा उल्लेख झाल्यावर निश्‍चितच डोळ्यासमोर उभी ठाकते ती मैदानावरील संघशाखा. मात्र कोरोनाच्या विरोधात लढणाऱ्या भारतीयांना संघाच्या नवीन रूपाचे दर्शन झाले.

प्रत्येक शहरात संघाचे सेवाकार्य जोमात सुरू असून, स्वयंसेवकाला येणारे अनुभव तितकेच विविधरंगी आहेत. त्रिमुर्तीनगर येथील सेवकाने तर उपासमारीची वेळ ओढावलेल्या रमाईलाच जगविण्याचेच प्रयत्न केले. कौशिक लाकडे असे त्यांचे नाव आहे. पूर्वी रामेश्‍वरी भागात राहणाऱ्या रमाई यांच्या पतीने दुसरा संसार थाटला व दोन मुली व मुलासह रमाईला बेघर केले. आता हक्‍काचे घर नाहीच पण जगण्याचीही भ्रांत. शिवाय यापूर्वी कधीही रोजगारासाठी उंबरठा ओलांडण्याची वेळ न आल्याने रमाईची उपासमार होत गेली. त्यांच्या दोन मुली सध्या मुंबईत अडकल्या असून, उपासमार होऊ नये म्हणून रमाईने मुलाला मामाकडे पाठवले आहे.

विशेष म्हणजे नियमित अन्न न मिळू शकलेल्या रमाईला अशक्‍तपणामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले अन्‌ ही परिस्थिती संघाच्या लोककल्याण समितीच्या युथ फॉर सेवा योजनेत काम करणाऱ्या कौशिक लाकडे यांना समजली. अन्‌ स्वत:च्या आरोग्याची चिंता न करता बेधडक सेवाकार्याचा सपाटा लावलेल्या कौशिकची पावलं रुग्णालयाच्या दिशेने वळली. कौशिक लाकडे याने रमाईची स्थिती समजून घेतली. त्यांच्यासाठी भोजनाची अन्‌ औषधाची जुळवाजुळव केली अन्‌ संपर्क कायम ठेवला. पुढे रमाईला रुग्णालयातून सुटी झाली अन्‌ कौशिक लाकडे यांनी त्यांच्या घरी अन्नधान्याची किट पोहचविण्याची व्यवस्था केली. आज थोडी थोडकी का होईना पण स्थिती सुधारली आहे. रमाईचा जगण्याचा संघर्ष संपलेला नाही कारण आर्थिक उत्पन्नाचे साधन अद्याप गवसलेले नाही. किमान लॉकडाऊन संपेपर्यंत मदतीचे आवाहन त्यांनी केले आहे.

मुलींसाठीही रमाईचा संघर्ष कायम

रमाईच्या एका मुलीचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले आहे तर दुसरीचे एमटेक झाले आहे. शिक्षणासाठी मुंबईत असलेल्या मुली बेरोजगार असून, तेथेच अडकलेल्या आहेत. शिवाय मुलगा बारावीला आहे. किमान मुंबईत अडकलेल्या मुलींना नागपुरात आणता यावे यासाठी सध्या रमाईचा संघर्ष सुरू आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT