RTE's admission process has finally started 
नागपूर

आरटीई'ची प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असताना, जिल्ह्यात त्याबाबत हालचाली नसल्याचे चित्र होते. शुक्रवारी विभागाला प्रक्रिया राबविण्याबाबत महापालिकेने परवानगी दिल्यानंतर आता सोमवारपासून शाळांमध्ये कागदपत्रांची प्राथमिक तपासणी केल्यावर तात्पूरता प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत यंदाच्या सत्रात प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून, सोडतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. याशिवाय प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे. याबाबत सर्व विद्यार्थ्यांना 17 मार्च रोजी संदेश पाठविण्यात आले होते. मात्र, टाळेबंदीमुळे पुढील प्रवेश प्रक्रियेचे कामकाज झालेले नाही.

सद्यस्थितीत पडताळणी केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडू नये म्हणून केवळ यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी 24 जून रोजीपासून शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी सुरू होणार होती. यासाठी शाळांना "आरटीई' संकेतस्थळाची लिंक देत, या माध्यमातून शाळा पालकांना संदेश पाठविण्यात येणार होते. याशिवाय शाळांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी पालकांच्या संदेशामध्ये प्रवेशाची वेळ आणि तारीख दिली जाणार होती. मात्र, 24 जून उलटल्यावरही शाळांकडून संदेश न आल्याने पालकांमध्ये चिंता वाढली.

शुक्रवारी या बाबत महापालिका आयुक्तांनी प्रवेश प्रक्रिया राबविण्याची परवानगी दिल्यावर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढून शाळांना पाठविले. आता सोमवारपासून पालकांना संदेश मिळणार आहे. त्यासाठी संबंधित पालकांना मूळ प्रमाणपत्रे व छांयाकित प्रतीच्या एका संचासह संबंधीत दिवशी शाळेवर उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. यानंतर ही कागदपत्रे, मुख्य पडताळणी समितीकडे जाणार आहे. समिती कागदपत्रे तपासून त्यांना अलॉटमेंट लेटर देण्यात येणार आहे.

इन्फोबॉक्‍स
शहरातील जागा - 6,784
आलेले अर्ज - 31,044
निवड झालेले विद्यार्थी - 6,685

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Police Report : नसरापूर प्रकरणातली पोलिस रिपोर्ट आला; भीमराव कांबळेने गाठी शेव खायला देण्याचं आमिष दाखवलं अन्...

LPG Rules India : एलपीजी वापरणाऱ्यांसाठी मोठा इशारा ! ... तर तुमचं कनेक्शन बंद होऊ शकतं, जाणून घ्या नवीन नियम

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर धडाका! दुसऱ्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई

CIBIL स्कोर चेक करायला एक रुपयाही होणार नाही खर्च; काही सेकंदात मिळेल संपूर्ण रिपोर्ट, 'इथे' पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणावरुन पुण्यात एकनाथ शिंदे गटाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT