नागपूर

नवीन शैक्षणिक वर्ष 15 ऑगस्टनंतर, अशा पद्धतीने करणार मूल्यांकन

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयाच्या नवीन शैक्षणिक वर्षाला 15 ऑगस्टनंतर सुरुवात करण्याचा निर्णय विद्वत परिषदेत घेण्यात आला. याशिवाय पदवी प्रथम आणि द्वितीय वर्ष आणि पदव्युत्तर द्वितीय सत्राचे निकाल सरासरी मूल्यांकनानुसार जाहीर करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांचा पेच सुरू असला तरी इतर सत्रांचे शैक्षणिक सत्र आणि मूल्यांकनासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाने दिशानिर्देश जाहीर केले होते. त्यानुसार विद्यापीठाने मंगळवारी विद्वत परिषदेसमोर प्रस्ताव ठेवला. यानुसार अंतिम वर्ष वगळता इतर सत्र आणि वर्षातील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देणे, परीक्षा न घेता सरासरी मूल्यांकन करणे आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर यावेळी चर्चा करण्यात आली.

यानुसार सरासरी मूल्यांकनानुसार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करत सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रदेश देण्यावर विद्वतजनांनी शिक्कामोर्तब केले. याशिवाय उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या एक ऑगस्टपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या सूचना असल्या तरी निकालाला विलंब होणार असल्याने 15 ऑगस्टनंतर ऑनलाईन शैक्षणिक वर्गाला सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑनलाईन वर्ग घेणे हे आता महाविद्यालयांसमोर नवीन आव्हान राहणार आहे.

पुढील वर्गात प्रवेश

अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्ष व सत्रांच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यांना 50 टक्के अंतर्गत मूल्यांकनावर आधारित गुण व 50 टक्के पूर्व परीक्षेचे गुण देऊन परीक्षेचा निकाल तयार करून तो 15 ऑगस्टपर्यंत देण्यात येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यांकन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दिली.

अनुत्तीर्णांची परीक्षा 120 दिवसांत

उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाच्या दिशानिर्देशानुसार जे विद्यार्थी आधीच्या सत्रात अनुत्तीर्ण आहेत त्यांची परीक्षा ही नोव्हेंबर महिन्यात किंवा हिवाळी परीक्षांसोबत घेतली जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यावर 120 दिवसांत परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एका सत्रासाठी विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला असला तरी अनुत्तीर्ण असलेल्या मागील सत्राची परीक्षा देणे अनिवार्य राहणार आहे.

संपादन : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT