rural health department officer negligence towards corona  
नागपूर

ग्रामीण आरोग्य यंत्रणा वाऱ्यावर! पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; आरोग्य अधिकारी 'नॉट रिचेबल

नीलेश डोये

नागपूर : ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. परंतु, याकडे अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे लक्ष नाही. उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मनोहर कुंभारे यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने हा विभागच वाऱ्यावर गेल्याचे चित्र आहे. तर आरोग्य अधिकारी 'नॉट रिचेबल' असल्याचा अनुभव काहींनी बोलून दाखविला. यामुळे ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणात येणार कसा, असे म्हणत आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर अनेकांनी आक्षेप घेतला. 

रुग्णसंख्या सातत्याने वाढते आहे. शासनाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यास सांगितले आहे. परंतु याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याचे सांगण्यात येते. क्वारंटाइन केंद्र आता वाढविण्यात आले. ग्रामीण भागातील रुग्ण शहरात उपचारासाठी आल्यानंतर कुठलीही संपर्क यंत्रणा किंवा आरोग्य विभागाची माहिती यंत्रणा कार्यान्वित नाही. तसे उपाध्यक्षाचे खाते अध्यक्षांकडे हस्तांतरित झाले. पण अध्यक्षही स्वस्थ बसले आहेत. परिस्थितीचा आढावा नाही, विभागाकडून माहिती घेण्यात येत नाही. आरोग्य अधिकारी कनिष्ठांवर भार टाकून मोकळे झालेत. त्यांच्याकडे गेले की, 'साहेब मिटींगला आहेत', असेच उत्तर कर्मचाऱ्यांकडून मिळते. पदाधिकारी, सदस्यांना सुद्धा त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याची ओरड आहे. सीईओ आणि काही अधिकारीच प्रामाणिकपणे काम करीत असल्याचे सांगण्यात येते. 

अर्वाच्य शब्दांचा वापर? -
ग्रामीण भागातील रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर, परिचारिकांची नियुक्ती करण्यात येत आहे. याकरिता इंटरव्यूह घेण्यात येतात. यात आरोग्य अधिकाऱ्यांकडून चांगल्या शब्दाचा वापर होत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही लोकांनी याची तक्रार पदाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi cabinet: राज्यसभा तिकिटांनंतर मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा बदल? चार मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांची चर्चा... कुणाला संधी?

Gold Price Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! उच्चांकापासून ₹31,000 स्वस्त; दसऱ्याआधी किती रुपयांना विकलं जातंय सोनं?

IND vs WI 1st T20I: वैभव सूर्यवंशीला आज संधी मिळणार का? भारतीय प्रशिक्षकाने दिले महत्त्वाचे अडेट्स; म्हणाला...

‘मला पाहून महिला थुंकायला आणि चपलेने मारायला यायच्या’; दृश्यममधील गायतोंडे फेम कमलेश सावंत म्हणाले...‘ही खंत आयुष्यभर राहील’

Marathi News Live Updates: महायुतीत बंडखोरीचे सत्र सुरूच; शेखर भोयर यांच्यानंतर भाजपच्या डॉ. संगीता शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT