Sachin Tendulkar's 50th birthday wishes from nagpur friend naresh cricket sport
Sachin Tendulkar's 50th birthday wishes from nagpur friend naresh cricket sport  esakal
नागपूर

Sachin Tendulkar's 50th birthday : सचिनने जपली नागपूरकर नरेशसोबतची मैत्री

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : माणूस मोठा किंवा यशस्वी झाला की, तो जवळचे मित्र व नातेवाईकांना विसरतो. पैसा व प्रसिद्धीच्या नशेत रक्‍ताचेही नाते दूर सारतो. पण, भारताचा महान फलंदाज भारतरत्न सचिन तेंडुलकर यास अपवाद ठरला. यशाचे शिखर गाठूनही सचिन आपल्या नागपूरकर मित्राला कधीच विसरला नाही. तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोटूनही सचिनने नरेश वाघमोडेसोबतची मैत्री कायम ठेवली आहे.

उद्या, सोमवारी ५० वा वाढदिवस साजरा करीत असलेला सचिन आणि नागपूरकर नरेश यांचे नाते अगदी कृष्ण व सुदामासारखे आहे. १९८७-८८ मध्ये सुरू झालेली मैत्री आजतागायत कायम आहे. आंतरविभागीय स्पर्धेच्या निमित्ताने लहानगा सचिन त्यावेळी प्रथमच नागपुरात आला होता. त्यावेळेस दोघांची जुन्या व्हीसीएवर पहिल्यांदाच भेट झाली होती. सांगितले. सचिनच्या आईने वाढदिवसाला निमंत्रित केले होते. मात्र तब्येत खराब असल्यामुळे व पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मुंबईला जाणार नसल्याचे नरेशने सांगितले.

मुंबई ज्युनिअर संघाचा कर्णधार असलेल्या सचिनला नेट प्रॅक्टिसदरम्यान ‘बॉलिंग'' करणे तसेच ‘नॉकिंग''ला मदत करणे, इत्यादी कामे नरेश करायचा. इतकेच नव्हे, तर सचिन मुक्‍कामाला असलेल्या आमदार निवासातही तो नियमित जायचा. सचिनला जेवणासाठी सायकलवरून १६० गाळ्यांच्या खोलीपर्यंत नेण्यापासून तर, आमदार निवासातील कंपाऊंड परिसरात फेरफटका मारण्यापर्यंत सचिनची प्रत्येक हौस नरेशने त्यावेळी भागविली. नरेशच्या मनमिळाऊ स्वभावामुळे सचिन त्याचा कायमचा मित्र बनला.

विनम्र स्वभावाचा सचिन त्यानंतर असंख्यवेळा नागपुरात आला. पण तो कधीही आपल्या बालपणीच्या मित्राला विसरला नाही. ३६ वर्षांपूर्वीची मैत्री त्याने आजही तेवढ्याच प्रामाणिकपणे जपली आहे. मधल्या काळात नोकरी व कामाच्या व्यापामुळे नरेशचे व्हीसीएवर जाणे बंद झाले. एकेदिवशी नरेश न दिसल्याने सचिनने त्याच्याबद्‌दल चौकशी केली आणि व्हीसीएवर बोलावून घेतले. नरेश आतापर्यंत अनेकदा सचिनच्या घरी गेला. सचिनचे जुने निवासस्थान असलेल्या ‘साहित्य सहवासात’ तो तब्बल दीड वर्षे राहिला.

शिवाय सचिनचे लग्न, वडिलांचे निधन व नवीन बंगल्यामध्ये सामान ‘शिफ्टिंग''च्या वेळीदेखील तो अनेकवेळा तेंडुलकर परिवारात मुक्कामी होता. सचिननेही एकदा नरेशच्या गोपालनगरातील किरायाच्या घरी भेट दिली होती. उल्लेखनीय म्हणजे, नरेशच्या लग्नानंतर सचिनने दोघांनाही मुंबईला बोलावून त्यांचे यथोचित आदरातिथ्य केले होते. त्यावेळी स्वत: सचिनच्या आईने स्वयंपाक केला आणि जाण्यापूर्वी नरेशची पत्नी मीनाला साडीचोळी दिल्याची आठवण नरेशने सांगितली. याशिवाय वानखेडे स्टेडियमवर सचिनच्या निवृत्तीच्या ऐतिहासिक क्षणाचाही नरेश साक्षीदार राहिला आहे. निरोपाच्या सामन्यासाठी सचिनने त्याला खास निमंत्रण दिले होते. सामन्यानंतर अंजलीने आयोजित केलेल्या पार्टीलाही नरेश आवर्जून उपस्थित होता.

सचिन खाण्यापिण्याचा खुपच शौकिन आहे. व्हीसीएवर आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी आला की, तो नरेशकडून किंवा प्रशांत वैद्य यांच्याकडून वांग्याचं भरीत, उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, फोडणीचं वरण इत्यादी अस्सल वैदर्भी पदार्थ हॉटेलमध्ये मागवायचा. नरेशनेही आपल्या मित्राची प्रत्येक हौस भागविली. गणपती व साईचा भक्‍त असलेला सचिन गजानन महाराजांनाही खूप मानतो. त्याची आईसुद्धा रोज नियमित महाराजांची पोथी वाचते. काही वर्षांपूर्वी अंबाझरी परिसरातील गजानन महाराजांच्या मंदिरातही तो जाऊन आल्याची आठवण नरेशने यावेळी सांगितली.

वाढदिवशी देतो फोनवरून शुभेच्छा

नरेश वाघमोडे सचिनचा वाढदिवस (२४ एप्रिल) कधीच विसरत नाही. या दिवशी तो वेळात वेळ काढून सचिनला हमखास फोन करतो व शुभेच्छा देत असतो. ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या दिवशीच सचिनशी फोनवरून बोलणे झाल्याचे व शुभेच्छा दिल्याचे नरेशने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

SCROLL FOR NEXT