नागपूर

Anil Deshmukh: सचिन वाझे पुन्हा फिरले, यापूर्वी चौकशीत दिली होती अनिल देशमुखांना क्लिनचीट...'रोजनामा'त धक्कादायक माहिती

Sachin Vaze Gives Clean Chit to Anil Deshmukh in Chandiwala Commission Inquiry : नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांनी सांगितले, त्यांच्या वरती शंभर कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

Sandip Kapde

सचिन वाझे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच आपल्यावर आरोप केले आहेत. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत 'रोजनामा' दाखवत फडणवीसांवर आरोप केला. त्यांनी सांगितले की, चांदीवाला आयोगाच्या चौकशीत सचिन वाझे यांनी सांगितले होते की, "मला पैसे मागितले नाहीत". त्या चौकशी अहवालात देशमुखांना क्लीन चिट देण्यात आली होती, पण फडणवीस त्या अहवालाला समोर आणत नाहीत, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला.

नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांनी सांगितले, त्यांच्या वरती शंभर कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

उद्धव ठाकरे यांनी सेवानिवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चांदीवाला आयोगाची नेमणूक केली. चौकशी दरम्यान अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्या बाजूच्या वकिलांनी एकमेकांना विचारपूस केली होती.

चौकशीच्या दरम्यान, 14 डिसेंबर 2021 रोजी चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझे यांना अनिल देशमुख किंवा त्यांच्या पीए यांच्याकडून पैशाची मागणी झाली का, असा प्रश्न अनिल देशमुख यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी विचारला होता. त्यावर वाझे यांनी "नाही" असे उत्तर दिले होते.

अनिल देशमुख यांनी हा 'रोजनामा' दाखवत दावा केला की, हा चांदीवाला आयोगाच्या अहवालाचा एक भाग आहे आणि त्या अहवालात त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. देशमुख यांनी राज्य सरकारला हा अहवाल जाहीर करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT