Sadanand Fulzele 
नागपूर

दीक्षाभूमीचा सजग प्रहरी निवर्तला, सदानंद फुलझेले यांचे निधन 

सकाळवृत्तसेवा

नागपूर : दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. सदानंद फुलझेले (वय 92) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली नागपूरच्या ज्या पवित्र दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या दीक्षाभूमीच्या निर्माणात फुलझेले यांची मोलाची भूमिका होती. 

सदानंद फुलझेले यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1928 रोजी नागपुरातील धरमपेठ भागात झाला. त्याना आंबेडकरी चळवळीचे बाळकडू कुटुंबातूच मिळाले. 1942 साली शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या स्थापनेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूरला आले होते, त्यावेळी फुलझेले यांनी पहिल्यांदा बाबासाहेबांना पाहिले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी समता सैनिक दल व शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली.

1952 साली त्यांनी धरमपेठच्या डॉ. आंबेडकर नगरातून महानगरपालिकेची निवडणूक लढविली व जिंकली. त्यानंतर 1956 साली त्यांची नागपूरच्या उपमहापौरपदी निवड झाली. दरम्यान, त्यांची दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली. त्यानंतर 14 ऑक्‍टोबर 1956 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या भूमीत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी फुलझेले यांनी सांभाळली होती. त्यानंतर दीक्षाभूमीच्या निर्माणकार्यात फुलझेले यांची मोलाची भूमिका होती. 1963 साली त्यांची दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सचिवपदी निवड झाली. तेव्हापासून ते या पदावर कार्यरत होते. 

असंवेदनशीलतेचा कळस नुसता, गुंड मारत राहिले पण कोणीच बचावासाठी सरसावला नाही

फुलझेले यांच्या पश्‍चात तीन मुले, एक मुलगी व बराच मोठा आंबेडकरी परिवार आहे. त्याच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाल्याची प्रतिक्रया मान्यवरांनी व्यक्त केल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT