Safelkar is the mastermind of another murder Nagpur crime news 
नागपूर

सफेलकर आणखी एका खुनाचा मास्टरमाईंड; गुन्हा दाखल करण्याची तयारी

अनिल कांबळे

नागपूर : कामठीतील गँगस्टर रणजित सफेलकर हा आणखी एका हत्याकांडाचा मास्टरमाईंड असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता पोलिस नवीन गुन्हा दाखल करण्याच्या तयारीला लागले आहे. विशाल पैसाडेली असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा सफेलकर आणि राजू बद्रेने खून करून अपघात झाल्याचा बनाव केला होता.

२२ मार्च २००७ मध्ये विशाल पैसाडेली (३२, रा. कमसरी बाजार, कामठी) याचा मौदा वाळेगाव शिवारात कारच्या अपघातात मृत्यू झाला होता. या प्रकरणी खापरखेडा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला होता. यातील आरोपी कारचालक गौरव झाडे याला अटक करण्यात आली होती. त्याने कारचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची कबुली दिली होती. मात्र, हा अपघात नसून सफेलकर आणि राजू बद्रे यांनी घडवून आणलेले हत्याकांड असल्याचे उघडकीस आले आहे.

विशालचे सफेलकरच्या पत्नीशी मैत्री होती. त्या दोघांचे संबंध रणजितला खटकत होते. त्यामुळे त्याने विशालला ठार मारण्याचा कट रचला. आरोपी संजय बद्रे, श्रीकांत ऊर्फ भैया सांभारे, हेमंत गोरखा आणि तुषार दलाल यांनी विशालला वाळेगाव परिसरात ठार केले. त्याच्या अंगावरून स्कॉर्पीयो नेली आणि अपघाताचा बनाव केला. 

गौरवला केला बळीचा बकरा

सफेलकर आणि राजू बद्रेने विशालचा खून केल्यानंतर गौरव झाडे याला कारचालक म्हणून आरोपी होण्यास सांगितले. मात्र, गौरवने नकार दिला. त्यामुळे सफेलकरने त्याला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे गौरव तयार झाला. सफेलकरने अपघात झाल्याचा बनाव करीत गौरवला सरेंडर करण्यास सांगितले. त्याबदल्यात सफेलकरने गौरवला ५० हजार रुपये आणि न्यायालयीन खर्च उचलल्याचे आमिष दाखवले.

कायदेविषयक घेण्यात येणार सल्ला

२००७ ला घडलेल्या या हत्याकांडात अपघाताचा बनाव झाला असून त्यामध्ये आरोपी गौरव झाडे निर्दोष सुटला आहे. त्यामुळे हत्याकांडाचा नव्याने गुन्हा दाखल करण्यात येणार असून तपास करण्यात येणार आहे. त्यासाठी कायदेविषयक सल्ला, न्यायालयीन परवानगी आणि अन्य बाबींवर विचार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Snake Discovery: डोळे नसलेल्या सापावर संशोधन; पुण्यातील ‘तस्कर’ सापाची आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नोंद, डोळ्यांच्या जागी गुळगुळीत खवले!

Pune News: प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री! तिकिटावरील मर्यादा रद्द; विमान कंपन्यांनी दर वाढवले, काय आहेत कारणे?

Chhatrapati Sambhajinagar: चार किमी आले, उरले ३५ किलोमीटर!; दुसरा टप्पा सुरू; नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत कधी येणार?

Chhatrapati Sambhajinagar: थकबाकीमुळे ८१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Chhatrapati Sambhajinagar: आठवडाभरात मिळणार शिधापत्रिकेवर केरोसीन; कंपन्यांकडून तालुकानिहाय होणार वाटप

SCROLL FOR NEXT