नागपूर : पारशिवनी वन परिक्षेत्रातील टेकाडी येथे एका शेतातील विहरीत पडलेल्या एक वर्षाच्या बिबटाच्या बछड्याला वन विभाग आणि ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरच्या चमूने अवघ्या 50 मिनिटात यशस्वीरित्या बाहेर काढले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची वैद्यकीय तपासणी करुन त्याला पारशिवणीच्या बफर क्षेत्राजवळ निसर्गमुक्त केले.
ईश्वर गिरधर मांडारे यांच्या शेतातील विहिरीत एक वर्षाचा बछडा आढळून आल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी बी .आर. बैंगणे यांना ही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक एस. बी. गिरी यांनी उपवनसंरक्षक प्रभू नाथ शुक्ल, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांना कळविले. त्यांनी लगेच ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरच्या बचाव पथकाला घटनास्थळी रवाना केले. बचाव पथकाने बछड्याला बाहेर काढण्याची तयारी केली.
रेस्क्यू पथकातील डॉ. मयूर काटे, डॉ. सय्यद बिलाल, समीर नेवारे, सिद्धांत मोरे, वनपाल कैलाश जमगाडे, वनरक्षक दिनेश बोरकर, वनरक्षक मिलिंद वनकर, वनरक्षक अनिता कातखडे, वनरक्षक नारायण मुसळे, सोबत मदतनीस विलास मंगर, बंडू मंगर, शुभम मंगर, चेतन बावसकर वाहनचालक आशिष महल्ले यांनी पिंजरा विहिरीत टाकून बिबट्याला अवघ्या 50 मिनिटात जेरबंद करुन विहिरीच्या बाहेर काढले. वनपाल व्ही. एस. कांबळे, वनपाल असोले, वनरक्षक बी. एस .मेंढे, एस. ए. मानकर, वनमजुर देवराव भगत यांनी या कारवाईत सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.