sahil  
नागपूर

साहिलचे नखरे सुरू,म्हणतो, डॉ. गंटावार कोण?

सकाळ वृत्तसेवा

नागपूरः वादग्रस्त साहिल सैयदला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्यानंतर पीसीआरमध्ये त्याला खाक्‍या दाखवणे सुरू केले आहे. डॉ. गंटावार आणि साहिलने ऍलेक्‍सिसमध्ये बनावट छापा घालून खांडणी वसुलण्याचा कट रचला होता. या प्रकरणी पोलिस त्याला प्रश्‍न विचारत आहेत. मात्र, "डॉ. गंटावार कोण?' असा प्रतिसवाल तो पोलिसांना विचारून पोलिसांची दिशाभूल करीत आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात साहिल सय्यद याने महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार व अन्य एका अधिकाऱ्याला हाताशी धरून मानकापूरमधील ऍलेक्‍सिस हॉस्पिटलविरुद्ध कारवाई करवून घेतल्याची माहिती गुन्हेशाखा पोलिसांना प्राप्त झाली आहे. या दिशेने गुन्हेशाखा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असून, दुसरा अधिकारी कोण याचा तपास पोलिस करीत आहेत. मंगळवारी गुन्हेशाखा पोलिसांनी साहिल सय्यद याची कसून चौकशी केली मात्र तो सतत पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती देत आहे. गंटावारांशी असलेल्या संबंधाबाबतही पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली. मात्र गंटावार कोण, असा उलट प्रश्न तो पोलिसांना करीत आहे. त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. त्याला पाहूणचार दिल्यानंतर तो पोपटासारखा बोलेल, असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्‍त केला आहे.

ऍलेक्‍सिस हॉस्पिटलविरुद्ध कारवाई करण्यासाठी साहिल या महापालिकेच्या या अधिकाऱ्यासोबत बोलणी केली होती,असा दावा सूत्रांनी केली आहे. साहिल याच्याविरुद्ध फसवणूक व खंडणीचे चार गुन्हे दाखल आहेत. पाचपावलीतील फसवणूक प्रकरणात पोलिसांनी साहिल याला अटक केली. त्याच्याकडे चार पॅनकार्डही पोलिसांना आढळले. या पॅनकार्डबाबत साहिल काहीही माहिती नसल्याचे पोलिसांना सांगत आहे. साहिल हा 22 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत आहे. फरार असताना तो इंदूर येथे लपून बसला होता. तेथे त्याच्या डोक्‍यावर कुणाचा हात होता? याचा तपास पोलिस करीत आहेत. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो नागपुरातील कोणकोणत्या नेत्यांच्या संपर्कात होता, याचा तपासही गुन्हेशाखा पोलिस करीत आहेत. दरम्यान एका नायब तहसीलदाराला लाच प्रकरणात अडकविल्याचे प्रकरणाचा तपासही पोलिस करणार असल्याची माहिती आहे. आणखी दोन दिवस साहिल पीसीआरमध्ये असल्यामुळे साहिलच्या पापात भागीदार असलेल्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

संपादन- अनिल यादव
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अन्यथा असे आणखी अशोक खरात उदयास येतील; उत्तर महाराष्ट्रात अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त, संपत्ती लुटली, तरी सरकार निष्क्रिय!

Latest Marathi News Live Update : गंगापूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान

Ashok Kharat Case : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार ? रुपाली पाटील यांच्या पोस्टने खळबळ

Gold rate Today: नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात आज १ तोळ्याचा भाव किती?

Maternal Health : जिल्ह्यात ५ वर्षांत ३३ मातांचा मृत्यू; जिल्हा आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT