केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  nagpur
नागपूर

Nagpur: पारडी उड्डाणपुलाच्या खांबांवर झळकणार संतांची चित्रे

विदर्भातील संत’ ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात नितीन गडकरी यांचा मानस

सकाळ वृत्तसेवा

संत साहित्यातून प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कार होत असतात. त्यामुळे प्रत्‍येक पिढीला ते मार्गदर्शक ठरते. ‘विदर्भातील संत’ हा ग्रंथ त्‍यामुळेच युगानुकूल, समाजोपयोगी आणि युवापिढीसाठी मार्गदर्शक असा ठरेल. पारडीमध्ये उड्डाणपुलाच्या प्रत्येक खांबावर विदर्भातील संतांचे चित्र, परिचय आणि माहिती द्यावी, असा आपला मानस असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र डोळके यांच्या ‘विदर्भातील संत’ या ग्रंथाच्या प्रकाशनाप्रसंगी गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते. प्रख्यात संशोधक डॉ. म. रा. जोशी यांची यावेळी उपस्‍थ‍िती होती. गडकरी म्हणाले, पारडीमध्ये उड्डाणपुलाच्या प्रत्येक खांबावर विदर्भातील संतांचे चित्र, परिचय आणि माहिती द्यावी, असा आपला मानस आहे. या कार्यात डॉ. डोळके यांच्या पुस्तकाचा लाभ होणार असून माहिती तपासून घेणे सोपे होणार आहे.

याशिवाय, आजचा पिढी पुस्तके वाचत नाही ही बाब लक्षात घेऊन तुकाराम गाथा, ग्रामगीता असे संत साहित्य डिजिटल करावे, असे त्यांनी विदर्भ साहित्य संघाला सुचविले. पूर्वीच्या काळी महाल, इतवारी भागात होत असलेल्या विविध संतांच्या कीर्तन-प्रवचनांच्या आठवणींनाही गडकरी यांनी उजाळा दिला.

या पुस्तकात केवळ संतांची माहिती नसून संत परंपरेचे वैभव दिसून येते. संतपरंपरा हे व्यक्ती चित्रण नसून मानवी संस्कृतीचे अद्भुत असे दर्शन आहे, असे मत डॉ. म. रा. जोशी यांनी व्यक्त केले. अध्‍यक्षीय भाषणातून प्रदीप दाते यांनी डॉ. डोळके यांच्‍या कार्याचे कौतुक केले. प्रस्ताविक डॉ. डोळके यांनी केले. कार्यक्रमाला निवृत्त न्या. विकास सिरपूरकर, कवी, अनुवादक प्रफुल्ल शिलेदार, वि. सा. संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, डॉ. उदय गुप्ते उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन विवेक अलोणी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात मोठी उलथापालथ! इतकी वर्ष संघासोबत असलेल्या भरवशाच्या खेळाडूने साथ सोडली, MS Dhoni...

Trending : आता रात्री होणार नाही अंधार! अंतराळात लागणार ६० फुटांचा आरसा; अमेरिकेच्या प्लॅनने वैज्ञानिक चक्रावले, नेमका विषय काय?

Newly Married Woman : 2 दिवसांनी होतं मुलीचं बारसं, घरात चालू होती तयारी; पण त्याआधीच 23 वर्षांच्या 'या' उच्चशिक्षित माऊलीनं...

Latest Marathi News Live Update : तामिळनाडूमध्ये गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Pune Airport: पुणे विमानतळाचे जुने टर्मिनल ‘बिकास’च्या प्रतीक्षेत; दीड वर्षापासून बंद, पुनर्विकासासाठी २४ कोटी रुपयांचा खर्च

SCROLL FOR NEXT