पगार
पगार sakal
नागपूर

नागपूर : लस न घेतल्याने रोखले पगार!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लस न घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील अकरा कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्यात आले. यामुळे जिल्हा प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली असून आता लस घेण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे.

कोरोना विषाणूचा नवीन प्रकार समोर आला आहे. याची चांगलीच धास्ती शासन, प्रशासनाने घेतली असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. सरकारने शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले. त्यामुळे लसीकरणासाठी अप्रत्यक्षरीत्या सक्तीच करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी लसीकरण न करणाऱ्यांचे पगार रोखण्याचे आदेश काढले. जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत ३०४ कर्मचारी आहेत. यातील ११ कर्मचाऱ्यांनी एकही लस घेतली नसल्याचे समोर आले. या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार यातील ४ कर्मचाऱ्यांना नुकताच कोरोना झाला होता. त्यामुळे त्यांनी लस घेतली नाही. तर इतर सात कर्मचाऱ्यांना विविध आजार आहे. वैद्यकीय कारणामुळे त्यांनी लस घेतली नसल्याचे सांगण्यात आले. त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून इतर ४ कर्मचाऱ्यांनी लस घेण्याची हमी दिली. त्यामुळे येत्या काही दिवसात त्यांचा पगार होणार आहे. संजय गांधी निराधार योजना विभागातील कर्मचाऱ्यांची माहिती न आल्याने त्यांचेही पगार रोखण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरू - गुजरात येणार आमने-सामने; स्पर्धेतील आव्हान टिकवण्याचं दोन्ही संघांसमोर आव्हान

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT