corona testing corona testing
नागपूर

कोरोना चाचणीची नवी पद्धत; ICMR कडून मान्यता

भाग्यश्री राऊत

कोरोनाच्या आरपीसीआर चाचणीसाठी आता नाकातून किंवा तोंडातून स्वॅब घेण्याची गरज नाही. नागपुरातील निरी संस्थेनं व्हायरॉलॉजी शाखेनं नवीन पद्धत शोधून काढली आहे.

नागपूर - आता कोरोना चाचणीसाठी (corona testing) एखाद्या व्यक्तीचे नाक किंवा तोंडातून स्वॅब घेण्याची गरज भासणार नाही. येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्राने (NEERI) यावर नवीन पर्याय शोधून काढला आहे. या नव्या संशोधनानुसार आता कोरोना चाचणीसाठी व्यक्तीच्या थुंकीचे नमुने वापरले जातील. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) या संशोधनाला मान्यता दिली आहे. या नव्या निदान पद्धतीमुळे वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होईल. (saline water gargle useful for corona testing says neeri)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढल्या असून अहवाल यायला देखील तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो आहे. त्यामुळे रुग्णांवरील उपचारास देखील विलंब होताना दिसतो. वेळेत निदान न झाल्याने आणि उपचारही न मिळू शकल्याने अनेकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या सगळ्या गोंधळामध्ये टेस्टिंग लॅबवर देखील मोठा ताण येताना दिसतो, यामुळे आरोग्य यंत्रणाही मेटाकुटीला आली आहे.

अशी आहे पद्धत
‘निरी’ ने तयार विकसित केलेल्या नव्या चाचणी पद्धतीमध्ये व्यक्तीला सलाईनमध्ये वापरले जाणारे ग्लुकोज तोंडात घेऊन त्याच्या गुळण्या करण्यास सांगितले जाते. ही गुळणी नंतर एका बाटलीमध्ये साठविण्यात येते. पुढे याच थुंकीचा वापर आरटीपीसीआर टेस्टसाठी केला जातो. या चाचणीतून केवळ तीन तासांतच एखाद्या व्यक्तीला कोरोना आहे किंवा नाही ते समजू शकते.

या नव्या निदान पद्धतीमुळे चाचण्यांसाठी लोकांच्या रांगा लागणार नाहीत. शिवाय नाक आणि तोंडातून देखील स्वॅब घ्यावा लागणार नाही.या संशोधनामुळे लोकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचू शकेल. लवकरात लवकर याची अंमलबजावणी सुरू होणे गरजेचे आहे. सुरूवातीच्या टप्प्यात देशभरातील पाचशे लॅबमध्ये या पद्धतीचा उपयोग केला जाणार आहे.
- कृष्णा खैरनार, शास्त्रज्ञ, निरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT