Sana Khan Esakal
नागपूर

Sana Khan Murder : पप्पूनेच खून केल्याचा पोलिसांचा संशय.. सहा महिन्यांपूर्वीच झाले होते सनाशी लग्न

जबलपूर पोलिसांची माहिती : तपासासाठी केले हात वर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जबलपूरला गेल्यावर बेपत्ता झालेल्या भाजपाच्या नेत्या सना खान यांचा सुगावा लागलेला नाही. मात्र, कुख्यात अमित ऊर्फ पप्पू याच्यासोबत त्यांनी सहा महिन्यांपूर्वी लग्न केल्याची माहिती जबलपूर पोलिस अधीक्षकांनी दिली. जबलपूर पोलिस याबाबत आता कुठलाही तपास करणार नसल्याने पुढील तपास नागपूर पोलिसच करणार असल्याचे दिसून येते.

जबलपूर येथे कुख्यात पप्पूसोबत सना यांचे संबंध होते. एक ऑगस्टला त्यांनी पप्पूला कॉल केला होता. त्यावेळी त्यांचे भांडण झाले. दोन तारखेला शेवटच्या ट्रॅव्हल्सने त्या जबलपूरकडे निघाल्या. तिथून त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी घरच्यांशी संपर्क साधला.

दुपारीनंतर त्यांचा संपर्क न झाल्याने तीन ऑगस्टला त्यांच्या आईने मानकापूर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी जबलपूरला पथक पाठविले. दुसऱ्या दिवशी पप्पूने दमुआ येथील ढाब्यावर नोकराला गाडी धुण्यासाठी दिली.

त्यावेळी डिक्कीत रक्त असल्याचे सांगितले जाते. गाडी स्वच्छ केल्यावर नोकर सागर येथून निघून गेला. अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. जबलपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्पू आणि सना यांचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले. सनाचे दुसऱ्यासोबत संबंध असल्याची शंका त्याला होती. यातूनच पप्पूने सनाचा खून केला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह न मिळाल्याने घटनेला पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

‘सीआयडी मार्फत चौकशी करा’

भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकारी सना खान या जबलपूरला गेल्या असता संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्या. सहा दिवसांपासून सना खान यांचा कुठेही शोध लागला नसून, याप्रकरणाची चौकशी राज्याच्या गुप्तचर खात्यामार्फत करावी, अशी मागणी प्रदेश महामंत्री जुनेद खान यांनी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली. या खात्यामार्फत चौकशी केल्यास सना आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुढील ५ वर्षांत अब्जावधी लोकांकडे असेल स्वतःचा AI एजंट; मार्क झुकरबर्गचा मोठा दावा!

Mumbai Crime: धक्कादायक! अकाली बाळाला जन्म दिला आणि कचरापेटीत टाकलं, १९ वर्षीय अविवाहितेचं कृत्य

Latest Marathi News Live Update : चाकण-शिक्रापूर मार्गावर कंटेनर बंद पडण्याचे प्रकार वाढले; वाहतूक पूर्णपणे जाम

Ajinkya Rahane: रहाणेच्या निवृत्तीनंतर रोहित शर्मा भावुक; 'एकाच ड्रेसिंग रूममध्ये अनेक वर्षे...' म्हणत व्यक्त केल्या भावना म्हणाला...

Khadakwasla Dam Water Discharge : पुणेकरांनो सावधान! दुपारी 12 वाजता खडकवासल्यातून 22,880 क्युसेकने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, धरणाच्या साखळीत 'मुसळधार'

SCROLL FOR NEXT