Sana Khan sakal
नागपूर

Sana Khan : सना खानच्या मृतदेहासाठी गावागावात शोध मोहीम

सना खानच्या मृत्यूचा कबुली जबाब दिल्यावरही पोलिसांना अद्याप तिचा मृतदेह गवसलेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - सना खानच्या मृत्यूचा कबुली जबाब दिल्यावरही पोलिसांना अद्याप तिचा मृतदेह गवसलेला नाही. त्यामुळे तो मिळावा यासाठी पोलिसांचे कसोशिने प्रयत्न सुरू असून आता पुन्हा मृतदेह शोधण्यासाठी तीन पथके जबलपूरला पाठविण्यात आल्याची माहिती असून पोलिस नदीपासून ५० किलोमीटर परिसरातील प्रत्येक गावामध्ये मृतदेहाबाबतची शोधमोहीम राबविणार आहे.

सना खानची जबलपूरला पप्पू उर्फ अमित शाहू याने हत्या केली होती. दरम्यान तिचा मृतदेह हिरण नदीत फेकून दिल्याची माहिती पप्पूने दिली होती. तेव्हा पासून सातत्याने पोलिस मृतदेहाचा शोध घेत आहे. यादरम्यान ३०० किलोमीटर दूर एका विहिरीत संशयीत मृतदेहही ताब्यात घेतला.

विशेष म्हणजे, पोलिसांना सहआरोपी धर्मेंद्र सिंग याने दिलेल्या माहितीनुसार मृतदेह नदीत फेकून, बॅग तिथेच ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी बॅग आणि एक मोबाईलही जप्त केला. दुसरीकडे गेल्या तीन आठवड्यापासून पोलिसांकडून हिरण आणि नर्मदा नद्यांच्या आसपासच्या भागात शोध घेणे, अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीवर कारवाई करण्याचे काम सुरू केले. मात्र, पोलिसांना सना खानचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

त्यामुळे आता पुन्हा तीन नवी पथके जबलपूरला मृतदेह शोधाण्यासाठी पाठविण्यात आली असून हिरण आणि नर्मदा नदीजवळील ५० किलोमीटर अंतरावरील गावांमधील नागरिकांना त्याबाबत विचारणा करण्यात येणार आहे.

नागरिकाना करणार विचारपूस

पोलिसांना नदीजवळ बॅग आढळून आली. त्यात सना खानचे कपडे होते. त्यामुळे नदी नजीकच्या गावातील नागरिकांना काही संशयित वस्तू आढळली का? याबाबत विचारणा करण्यात येणार आहे. त्यातून सना खानत्या मृतदेहाबाबत काही माहिती मिळणार असा विश्‍वास पोलिसांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT