Sanjay Kumar Gupta raises awareness about traffic rules after his accident in nagpur
Sanjay Kumar Gupta raises awareness about traffic rules after his accident in nagpur  
नागपूर

'लोक मला पागल म्हणतात, पण मी ठाम', एका चुकीमुळे झाला अपघात अन् आता लोकांचा जीव वाचविण्यासाठी करतात धडपड

केतन पळसकर

नागपूर : वेळ सकाळी १०.३० वाजताची... नुकताच पाऊस थांबल्याने रस्त्यावरील गर्दी वाढलेली... कार्यालयात वेळेत पोहोचायला हवे म्हणून प्रत्येक जण लगबगीत... अशातच शहरातील एका सिग्नलवर एक व्यक्ती प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते. फलक हातात धरत ही व्यक्ती नागरिकांना काही तरी सांगू पाहत होती. 'तुम्ही हे काय करताय?' असे विचारले असता, 'लोक मला पागल म्हणतात. पण मी जनजागृती करतो. आणि यावर मी ठाम आहे' अशी तळमळ व्यक्त करून ही व्यक्ती बोलायला लागली. संजयकुमार गुप्ता हे या धैर्यशील व्यक्तीचे नाव. 

व्यवसायाने वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) असलेल्या संजयकुमार यांचा २००४ साली अवघ्या २७ व्या वर्षी अपघात झाला. या अपघातामध्ये मेंदू जवळील पेशींना मार लागल्याने ते दोन महिने कोमामध्ये होते. केवळ दुचाकीचा साइड स्टँड काढायचे राहिल्याने हा अपघात झाला आणि त्यांचे अख्खे आयुष्यच बदलून गेले. आपल्यावर बेतलेला हा प्रसंग इतर कुणाच्या आयुष्यात येऊ नये म्हणून जिद्दीने ही व्यक्ती शहरातील शाळा, महाविद्यालय, शिबिरे; इतकेच नाही तर रस्त्यावर तासन्‌तास उभे राहून जनजागृती करीत आहे. आजवर त्यांनी पंधराशे ते दोन हजार कार्यक्रमांच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम, व्यसनमुक्ती, आतंकवाद आदी विषयावर मार्गदर्शन करीत जनजागृती केली आहे. अपघातानंतर फार्मसीमध्ये फार्मासिस्ट म्हणून ते आज काम करीत आपला चरितार्थ चालवीत आहेत. ठरावीक काळापेक्षा जास्त काळ त्यांना स्मरण राहत नसल्याने ते रोज न चुकता दिनक्रम दैनंदिनीमध्ये लिहितात. साइड स्टँड न काढल्यामुळे झालेल्या या अपघातादरम्यान हेल्मेट न घातल्याची त्यांना खंत वाटते. 

मी पळू शकत नाही, दोन तासांपेक्षा जास्त काळ उभे राहिल्यास मी कोसळतो. माझ्या या कार्यातून एका व्यक्तीचे प्राण वाचल्यास मी समाधानी असेल. कोरोना काळात लोकांनी मास्कचा वापर करायला हवा. 
- संजयकुमार गुप्ता. 

संपादन - भाग्यश्री राऊत
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

SCROLL FOR NEXT