file photo
file photo 
नागपूर

सामान्यांच्या 'सन्मानधन'ला ग्रहण का लागले? 

केवल जीवनतारे

नागपूर : सामान्य नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी कल्याणकारी राज्यात विविध योजना राबविल्या जातात. या योजनांमधून रोजगार, निवारा, अन्न, शिक्षण, वैद्यकीय मदत आणि इतर नागरी सुविधा पुरवून सामान्यांचे जीवन अधिक सुसह्य करण्याचा प्रयत्न केला जातो. हेच उद्दिष्ट समोर ठेवून तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारतर्फे 'सन्मानधन' योजना सुरू करण्यात आली होती. वयोवृद्ध असंघटित घरकामगारांच्या कल्याणासाठी उचललेले ते पाऊल निश्‍चितच कौतुस्कापद होते. मात्र, पुढे सत्ताबदल झाला आणि ही सन्मानधन योजना बंद पडली. 

महाराष्ट्रात महाआघाडी सरकार आले. हातावर पोट असणाऱ्यांसाठी सन्मानधन योजनेची खरी गरज आज कोरोनाच्या आणीबाणीमुळे निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील घरकामगार कल्याण मंडळाच्या 7 ऑगस्ट 2013 रोजी झालेल्या बैठकीत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पुढाकारातून ही योजना सुरू केली. ज्या घरकामगारांनी वयाची 55 वर्षे पूर्ण केली, अशा नोंदणी असलेल्या कामगारांना सन्मानधन म्हणून 10 हजार रुपये देण्याचा ठराव या बैठकीत पारित करण्यात आला. महाराष्ट्र घरकामगार कल्याण मंडळाकडून या रकमेची तरतूद करण्यात आली. 

राज्यात अडीच ते तीन कोटी असंघटित कामगार आहेत. ज्यामध्ये माथाडी कामगार, सुरक्षारक्षक यांचा समावेश होतो. याशिवाय असंघटित मजूर, ऑटोरिक्षा ऑपरेटर्स, ट्रक, टेम्पो, टॅक्‍सी चालक, कचरा वेचणारे, वृत्तपत्र वितरण करणारी मुले, ऊस कामगार आणि शेतमजूर यांचाही यात समावेश होतो. पहिल्या टप्प्यात राज्यभरात अनेक घरकामगारांना या कल्याण मंडळातर्फे सन्मानधन मिळाले. 

अशा होत्या कल्याणकारी योजना 
अधिनियमाच्या कलम 19 अन्वये घरकामगारांसाठी कल्याणकारी योजनांची तरतूद केलेली आहे. अपघात घडल्यास लाभार्थ्यांना तत्काळ साहाय्य पुरविणे, लाभार्थ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य देणे, लाभार्थ्यांच्या अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या आजारावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय खर्चाची तरतूद करणे, महिला लाभार्थ्यांकरिता प्रसूती लाभाची तरतूद करणे, लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यावर कायदेशीर वारसाला अंत्यविधीच्या खर्चासाठी रक्कम प्रदान करणे तसेच दोन अपत्यांपर्यंत प्रसूतिलाभ कल्याण मंडळामार्फत उपलब्ध करून देण्याची सोय होती. 

घरकामगारांच्या पाल्यांसाठी 
नोंदणीकृत घरकामगारांच्या पाल्यांना विदेशी भाषा शिकता यावी, यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सहकार्याने त्यांना विदेशी भाषा शिकण्याची संधी देण्याची योजना राबवण्यात आली होती. याशिवाय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत घरकामगारांसाठी घरकामगार पदविका अभ्यासक्रम, तसेच त्यांच्या मुलामुलींना पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार होता. 


वयोवृद्ध घरकामगारांना सन्मानधन योजना नक्कीच दिलासादायक होती. वृद्धापकाळात मिळणाऱ्या या थोड्या रकमेचा आधार त्यांच्यासाठी भरपूर असतो. मंडळाची पुनर्रचना त्वरित करण्यात यावी आणि नोंदणीकृत घरकामगारांना 10 हजार रुपये देण्यात यावे. 
-विलास भोंगाडे, कष्टकरी जनआंदोलन, नागपूर. 

संपादन : मेघराज मेश्राम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT