Nitin Raut  Nitin Raut
नागपूर

‘पुढील आठवडा महत्त्वपूर्ण : २६ जानेवारीनंतरच शाळा, निर्बंधाबाबत निर्णय’

रुग्णसंख्येत वाढ बघून जिल्ह्यातील शाळांना सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : नागपूरसाठी पुढील आठवडा महत्त्वपूर्ण आहे. रुग्णसंख्येत वाढ बघून जिल्ह्यातील शाळांना सुरू (school) करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. २६ जानेवारी रोजी यासंदर्भात पुढील निर्णय जाहीर होईल. तोपर्यंत शाळा बंद असेल. २६ जानेवारी नंतरच नागपूर शहरात नवीन कोणते निर्बंध (new rules) लावायचे याबाबतचा निर्णय होईल, असे राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (nitin raut) यांनी सांगितले.

नागपुरात शनिवारी (ता. २२) पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोविड व्यवस्थापनासंदर्भात वरिष्ठ अधिकारी तसेच टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी हा माहिती दिली. नागपूरमध्ये रुग्णवाढ पाच हजारांच्या घरात आहे. अशावेळी कोरोना बाधितांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याबाबत चर्चा झाली.

पाच हजार रुग्णवाढ हा चिंतेचा विषय असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. रुग्णवाढ असली तरी रुग्ण गंभीर होऊन दवाखान्यात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. मृत्यूदर सुद्धा कमी आहे. रुग्णवाढ रोखण्यासाठी व्यापार, उद्योग, शिक्षण, प्रशिक्षण बंद ठेवण्याऐवजी समाजातील या सर्व घटकांसोबत बैठकी लावण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (nitin raut) यांनी दिले.

कोरोना (coronavirus) वाढल्यानंतर नागपुरातील शाळा बंद करण्यात आल्या. काही दिवसांनी शाळा सुरू होतील, अशी आशा होती. मात्र, शाळेत (school) मुलांना पाठवण्याबाबत पालक उत्सुक दिसत नाही. तसेच वाढली रुग्णसंख्या पाहून महापालिका शाळा सुरू करण्याच्या विचारात नाही. यामुळे पालकमंत्री नितीन राऊत यांनी २६ जानेवारीनंतरच शाळा सुरू करायच्या की नाही, याबाबत निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे.

कोरोनामुळे (coronavirus) शहरात काही निर्बंध लादण्यात आले आहेत. अचानक रुग्णांची संख्या वाढल्यानंतर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला. आता देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे वाटत असल्याने राज्य सरकारने शहराची परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्यास सांगितले आहे. असे असताना नागपुरात कोरोनाच्या निर्बंधामध्ये वाढ करायची की नाही (new rules), याबाबत २६ जानेवारीनंतर निर्णय घेणार असल्याचे पालकमंत्री नितीन राऊत (nitin raut) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT