Crime  Sakal
नागपूर

Crime : आईवडील शेतात गेल्यावर ते दोघेजण घरात भेटायचे अन् त्याचवेळी...

घरात नेमकं काय व्हायचं त्याचा थांगपत्ताही घरच्यांना लागत नव्हता.

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : एका अल्पवयीन मुलाचे त्याच्यापेक्षा एका वर्षाने मोठ्या असलेल्या आणि त्याच्याच सख्ख्या बहिणीच्या मैत्रीणीवर प्रेम जडले आणि त्या प्रेमप्रकरणातून ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना नागपूर येथील मौदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याची माहिती आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि मुलगा एकाच गावातील असून पीडित मुलगी ही आठवीत शिकते आणि मुलगा सातवीत शिकतो. मुलगी दररोज शाळेत जाताना आपल्या मैत्रिणीच्या घरी जायची त्यावेळी सातवीत असलेल्या तिच्या मैत्रिणीचा भाऊ त्याला दिसायचा. यावेळी त्यांची मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

या दोघांचे एकमेकांवर प्रेम जडल्यावर ते दोघेही कोणत्यातरी बहाण्याने एकमेकांच्या घरी जायचे. पण एकदा मुलगी मुलाच्या घरी आली असता मुलाची बहिण आणि घरचे शेतात गेले होते. त्यावेळी घरी कुणी नसल्याचा फायदा घेत या दोघांनी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरही घरचे शेतात गेल्यावर या दोघांनी सारखे शारिरीक संबंध ठेवले.

यातून या मुलीला गर्भधारणा झाली. एके दिवशी तिच्या पोटात दुखू लागल्याने आईने तिला दवाखान्यात नेले. पण तपासणीतून मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचं कळालं. हे कळताच आईने आपल्या मुलीला कानाखाली मारली. त्यानंतर घरी येऊन विचारणा केली असता मुलीने या मुलाबद्दल सांगितलं.

त्यानंतर मुलीच्या कुटुंबियाने मुलाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाला सध्या बालसुधारगृहात ठेवलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune District Bank Recruitment: पुणे जिल्हा बँक क्लार्क भरतीत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह; गुणपत्रक न जाहीर केल्याने उमेदवार संतप्त

फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२६ ची नामांकनं जाहीर! 'दशावतार', 'गोंधळ' आणि 'आता थांबायचा नाय!' चा डंका; पाहा सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्रींची यादी

Fulambri Governance : लोकांची अडवणूक थांबवा, कामे वेळेत पूर्ण करा : आमदार सुहास शिरसाठ यांचे फुलंब्रीतील अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Farmer Accident Insurance: मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचा अपघात विमायोजना लवकरच सुरू : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Mahabaleshwar Kelghar Ghat : केळघर घाटातील काळाकडा येथे दरड हटली, जेसीबी बाहेर; भूस्खलनाचा धोका कायम, रस्ता सर्व वाहतुकीसाठी बंद

SCROLL FOR NEXT