school bus 
नागपूर

स्कूल व्हॅनचे रूपांतर होणार ॲम्बुलन्समध्ये; महापौरांच्या ‘आरटीओ`ला सूचना

राजेश प्रायकर

नागपूर : ॲम्बुलन्सअभावी कोरोनाबाधिताचा मृत्यू होऊ नये, या हेतूने शहरातील बंद शाळांच्या स्कूल व्हॅनचे रूपांतर ॲम्बुलन्समध्ये करण्यात येणार आहे. महापौर संदीप जोशी यांनी आज याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. लक्षणे नसल्याने घरीच उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या समुपदेशनासाठी जोशी यांनी डॉक्टर्सही उपलब्ध करून दिले.

शहरात सद्यःस्थितीत महापालिकेच्या ४० ॲम्बुलन्स आहेत. सध्या शाळा बंद असून स्कूल व्हॅन उपयोगात नाहीत. या स्कूल व्हॅनमध्ये किरकोळ बदल करून त्याचे रुग्णवाहिकेत रूपांतर केल्यास रुग्णांसाठी ते सोयीचे होईल. अशा स्कूल व्हॅनचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्यात यावे, असे आवाहन जोशी यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना केले. कोरोनाशी संघटित लढा देण्यासाठी स्कूल व्हॅनमध्ये किरकोळ बदल करून त्याचे रुग्णवाहिकेत रूपांतर झाल्यास अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी तातडीची सेवा मिळू शकेल.

तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून बेरोजगारीचा सामना करणाऱ्या व्हॅन चालकांना रोजगार उपलब्ध होईल, याकडेही पत्रातून जोशी यांनी लक्ष वेधले. सूचनेची सकारात्मक दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी या सूचनेबद्दल अनुकूलता दर्शविली आहे. लक्षणे नसलेले कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. त्यांच्या समुपदेशनासाठी मनपा व आयएमएने पुढाकार घेतला. समुपदेशन पूर्णपणे नि:शुल्क असून डॉक्टरांना फोन करून लाभ घ्यावा, असे आवाहन जोशी यांनी केले.

फेसबुक लाइव्हद्वारे बाधितांचे समाधान... 

महापालिका व आयएमएने फेसबुक लाइव्हद्वारे गृहविलगीकरणातील रुग्णांच्या समाधानासाठी पाऊल उचलले आहे. बुधवार (९ सप्टेंबर) पासून दुपारी २ ते ३ वेळेत हा उपक्रम दररोज सुरू राहील. प्रत्येक दिवशी वेगवेगळे डॉक्टर्स ‘कोविड संवाद’च्या माध्यमातून मनपाच्या अधिकृत फेसबुक पेजवर लाइव्ह येतील. उद्या अमेय हॉस्पिटलचे डॉ. आनंद काटे आणि कोठारी हॉस्पिटलच्या डॉ. अर्चना कोठारी उत्तरे देतील.

बॉक्स...

समुपदेशन करणारे डॉक्टर व त्यांचे क्रमांक
डॉक्टर मोबाईल क्रमांक समुपदेशनाची वेळ
डॉ. कुंदा तायडे ९३७३१०६२०९ सायं. ६ ते ८ पर्यंत
डॉ. मनमोहन राठी ९८२२७२२५६९ दुपारी ४ ते सायं. ७
डॉ. विजया बालपांडे ९३७३२८४६९९ दुपारी ४ ते सायं. ७
डॉ. अन्नपूर्णा चौधरी ९८२३१२८२७७ दुपारी २ ते ४
डॉ. मलानी ९७३००३१०३३ दुपारी २ ते सायं. ६
डॉ. किशोर माने ९९२१६२८१८२ दुपारी ३ ते सायं. ५
डॉ. अर्जुन भोजवानी ९३२६९८४३२१ सकाळी १० ते दु. १
डॉ. विजया बालपांडे ९३७३२८४६९९ दुपारी ४ ते सायं.
डॉ. किशोर माने ९९२१६२८१८२ दुपारी ३ ते ५
डॉ. वंदना काटे ९८२२५६०४३१ सायं. ७ ते ८
डॉ. वाय. एस. देशपांडे ९८२३०८३८४१ सायं. ६ ते ८
डॉ. दिवाकर भोयर ९३७३१०५३७० सकाळी ९ ते दु. १ आणि सायं. ६ ते ९
डॉ. अर्चना देशपांडे ९८२२५७२१७१ दुपारी १२ ते २
डॉ. सौरभ बरडे ९८२२६४१२२० सकाळी ८ ते रात्री १०

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT