Schools also charge for online classes 
नागपूर

लूट! शाळांद्वारे "यांच्या'कडूनही सक्तीने ऑनलाईन क्‍लासेसची शुल्कवसुली

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार सोडतीत नाव आलेल्या विद्यार्थ्याला शाळेकडून ऑनलाइन शुल्कापोटी दोन ते तीन हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरटीईमधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठलेही शुल्क आकारण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश असताना शाळांकडून पालकांची लूट करण्यात येत आहे. याबाबत पालकांनी समितीकडे तक्रार केली असल्याचे समजते.

राज्यात आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेनुसार शाळांमध्ये तात्पूरता प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी सोडतीत क्रमांक लागलेल्या पालकांना कागदपत्रासह शाळेत जाऊन पडताळणी करुन घ्यायची आहे. यानंतर पालकांनी दिलेल्या कागदपत्रांची तपासणी मुख्य पडताळणी समितीमार्फत होऊन प्रवेश निश्‍चित केले जाणार आहे. मात्र, यापूर्वीच आरटीई ऍक्‍शन समितीने केलेल्या सर्व्हेक्षणात बऱ्याच प्रमाणात प्रक्रियेतील घोळ समोर येत आहे.

दोन दिवसांपूर्वी एकाच विद्यार्थ्याची तीन शाळेत वेगवेगळ्या जन्मतारखेच्या आधारावर प्रवेश घेतल्याची बाब समोर आली होती. याशिवाय बोगस उत्पन्नाचा दाखला आणि चुकीचा पत्ता देत, पालकांकडून शाळांची फसवणूक केल्याची बाब समोर आली होती. मात्र, आता खुद्द शाळांकडूनच ऑनलाइन शिक्षणाच्या नावावर पालकांची लुट करण्यात येत आहे. यामध्ये शहरातील नामवंत शाळांचा समावेश आहे. शहरातील 6 हजार 784 जागांसाठी 31 हजारावर अर्ज आले होते. त्यापैकी 6 हजार 500 विद्यार्थी अद्यापही प्रतिक्षा यादीत आहेत.


वडिलांचे नाव चुकल्याने नाकारला प्रवेश
वडिलांचे नाव चुकीचे आल्याने शाळेने प्रवेश नाकारल्याची माहिती समोर आली आहे. रिधीमा नितीन लांजेवार असे विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने अर्जात योग्य नाव टाकले असताना अलॉटमेंट लेटरमध्ये नितीनऐवजी प्रवीण नाव आले. त्यामुळे शहरातील नामवंत सीबीएसई शाळेने प्रवेश देण्यास नकार दिला आहे.


पालकानेच घेतले नाव परत
नामवंत शाळेत प्रवेश मिळाल्यावरही एका पालकाने आपल्या पाल्याला प्रवेश नको असल्याचे पत्र समितीकडे दिले आहे. मोहना खोडनकर असे या पालकाचे नाव आहे. त्यांच्या मुलाला सोडतीमध्ये सिव्हिल लाइन्स येथील भारतीय विद्या भवन येथे प्रवेश मिळविला होता. मात्र, प्रवेशादरम्यान हमीपत्र भरून द्यायचे असल्याचे समजताच त्यांनी प्रवेश न घेण्याचे पत्र समितीकडे पाठवून तो रद्द करण्याची मागणी केली.


आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेत बरेच घोळ असून समितीमार्फत अनेक प्रवेश रद्द होणार आहेत. त्या जागेवर खऱ्या अर्थाने पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा प्रयत्न पडताळणी समिती करणार आहे.
शाहिद शरीफ, आरटीई ऍक्‍शन समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT