Schools in Nagpur will be unlocked in the new year Nagpur school news 
नागपूर

नव्या वर्षात नागपूर शहरातील शाळा होणार ‘अनलॉक’; चार जानेवारीपासून वाजणार घंटा

राजेश प्रायकर

नागपूर : शहरातील शाळा चार जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शनिवारी काढले. मात्र, शाळा सुरू करण्यासाठी सस्थांचालकांची अटीची पूर्तता करावी लागणार आहे. विशेष म्हणजे शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल शाळा व्यवस्थापन समितीकडे सादर करावा लागणार असल्याने पुन्हा चाचणी करावी लागणार आहे.
 
राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंत माध्यमिक शाळा व कॉलेज सुरू करण्याचे आदेश काढले होते. महापालिकेनेही तयारी केली होती. परंतु, पालकांनी संमतीपत्र न दिल्याने महापालिकेने शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा निर्णय बदलत तीन जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आली.

शनिवारी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरातील नववी ते बारावीपर्यंत शाळा, महाविद्यालय चार जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश काढले. शाळा सुरू करताना आवश्यक उपाययोजनांच्या सूचनाही त्यांनी आदेशातून केल्या आहेत.

शाळेची स्वच्छता, निर्जंतुकीकरण्यासोबतच शाळेत थर्मामीटर, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. स्कूल बसचे निर्जंतुकीकरण, शाळेतील बैठक कक्षात सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे.

एका बाकावर एकच विद्यार्थी बसविण्यात यावा, शाळेत दर्शनी भागात मास्कचा वापर, सॅनिटायझर वापराबाबत मार्गदर्शक सूचनांचे फलक लावण्यात यावे, रांगेतील मुलांचे अंतर सहा फूट असावे, त्यासाठी विशेष चिन्ह तयार करावी, शाळेत येण्याचा व बाहेर जाण्याचा मार्ग वेगवेगळा असावा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. महापालिका क्षेत्रात मनपा शिक्षणाधिकाऱ्यांनी यावर लक्ष ठेवावे, असेही निर्देशही त्यांनी दिले आहे.

बंद खोल्यात वर्ग घेऊ नये, वर्ग खोल्यांची दार, खिडक्या उघड्या ठेवाव्या, खिडक्या नसलेल्या खोलीत वर्ग घेऊ नये, असेही निर्देश त्यांनी दिले आहे. शहरातील सर्व शाळांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले की नाही? याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी मनपा शिक्षणाधिकारी तसेच जिलहा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.

अशा आहेत अटी 

  • खिडक्या नसलेल्या खोलीत वर्ग घेता येणार नाही
  • वर्ग खोलीच्या खिडक्या व दारे कायम उघडी ठेवावी
  • स्कूल बसचे दिवसातून दोनदा निर्जंतुकीकरण
  • रांगेतील दोन विद्यार्थ्यांत सहा फुटाचे अंतर
  • शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार
  • शहरातील एकूण शाळा ः ५९३
  • विद्यार्थ्यांची संख्या ः १ लाख ३२ हजार 
  • शिक्षकांची संख्या ः ६ हजार २५२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS transfers: महाराष्ट्रात मोठा प्रशासकीय फेरबदल! १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; माजी DGP रश्मी शुक्लांवर नवी जबाबदारी

पैसे मिळाले तर पुन्हा बैलासमोर नाचशील का? क्षणाचाही विचार न करता गौतमी पाटीलने दिलं उत्तर, म्हणते- भाई...

Bike Car Accident : मोटारसायकल व मारूती कार अपघातात व्यापाऱ्याचा मृत्यु, एक जखमी

Latest Marathi News Live Update : वायगाव-निपाणी परिसरातील नागरिकांची महावितरणविरोधात जोरदार निदर्शने

Uddhav Thackeray निष्ठावंत Omraje Nimbalkar साथ सोडणाऱ्यांच्या यादीत?पुण्यातून दिल्लीला कसे पोहोचले?

SCROLL FOR NEXT