मूर्तिकार
मूर्तिकार  e sakal
नागपूर

गणेशाला घडविणारे मूर्तिकार संकटात, यंदाही आर्थिक नुकसानीची भीती

केतन पळसकर

नागपूर : भारतीय संस्कृतीमध्ये गणपतीला विशेष महत्त्व आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हा उत्सव दहा दिवस साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या तीन महिने अगोदर सुरू होणाऱ्या कामाने अद्यापही जोर धरला नाही. येणारी तिसरी लाट बघता नुकसान टाळावे म्हणून मूर्ती रूपात गणेशाला घडविणाऱ्या हाताने संयम राखला आहे.

मागील वर्षी लॉकडाउन आणि सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करण्यास परवानगी न मिळाल्याने मूर्तिकारांना मोठा फटका बसला. यातून सावरत असताना गणेश उत्सवाच्या तोंडावर राज्यामध्ये पुन्हा लॉकडाउन घोषित करण्यात आल्याने मूर्तिकारांना धडकी भरली आहे. मूर्तीची विक्री जरी एका विशिष्ट महिन्यामध्ये होत असली तरी याची तयारी मूर्तिकार सुमारे दहा महिन्यांपूर्वी पासूनच सुरू करतात. ही केलेली मेहनत आणि यामध्ये गुंतवलेले भांडवल यामुळे मागील वर्षी सारखा फटका बसू नये म्हणून यंदाच्या वर्षी मूर्तिकार सावध झाले आहेत. गणेशोत्सवदरम्यान कोट्यवधींच्या उलाढालीवरच त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. शहरात अनेक कारागीर गणेशमूर्ती सहित देखाव्यांच्या मूर्तीही घडवितात. त्यांचे नियोजन एप्रिल-मे महिन्यापासूनच सुरू होते.

मूर्ती तीन फुटांपेक्षा कमीच?

प्रशासनाने मागील वर्षी तीन फुटावरील मूर्तीला परवानगी दिली नाही. या भीतीने मूर्तीकारांनी यावर्षी फक्त तीन फुटापर्यंतच्या मूर्तीचीच निर्मिती केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मूर्तीकारांच्या सरासरी उत्पन्नाला मागील वर्षी फटका बसला होता.

मूर्ती प्रक्रियेवर परिणाम -

मूर्ती बनविण्याची प्रक्रिया किचकट, वेळ खाऊ असल्याने मूर्तिकार दिवाळीनंतर घरगुती मूर्ती बनविणे सुरू करतात. एप्रिलमध्ये या मूर्त्यांना रंगरंगोटीचे काम सुरू केले जाते. मात्र, लॉकडाउनच्या भीतीमुळे या सर्व प्रक्रियेवर परिणाम झाला आहे.

मागील वर्षी फटका बसला. मात्र, मूर्तीकारांमध्ये उत्साह कायम आहे. कोरोनाची भीती प्रत्येकाला आहे. आणखी कडक लॉकडाउन लागल्यास मूर्तीकारांच्या आर्थिक समस्यांमध्ये जास्त वाढ होणार आहे.
-सुरेश पाठक, मुख्य संयोजक, प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्ती विरोधी कृती समिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT