second cath lab sanctioned in super specialty hospital in nagpur 
नागपूर

खुशखबर! आता हृदय शस्त्रक्रियेसाठी होणार नाही गैरसोय, कॅथलॅब गरीबांसाठीही ठरणार वरदान

केवल जीवनतारे

नागपूर : हृदयावर गुंतागुंतीची प्रक्रिया करणारे सुपर स्पेशालिटी हृदयरुग्णांसाठी वरदान ठरत आहे. यामुळे रुग्णांची गर्दी वाढली. मात्र, येथे एकच कॅथलॅब असल्याने मर्यादित रुग्णांना उपचार मिळत होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालया(मेडीकल)शी संलग्न सुपरमध्ये नुकतीच नवीन 'कॅथलॅब' मंजूर झाली. जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या ६ कोटी १५ लाखांतून ही कॅथलॅब खरेदी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

मेडिकलशी संलग्न सरकारी रुग्णालयात उपचाराचे प्रमुख केंद्र म्हणून सुपर स्पेशालिटीकडे बघितले जाते. दर दिवसाला हजारावर गरीब रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. मात्र, मर्यादित पायाभूत सुविधा असल्याने अनेक रुग्णांना प्रतीक्षा करावी लागते. मात्र, अलीकडे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी रुग्णांना योग्य सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सुपरमध्ये एकच कॅथलॅब असल्यामुळे रुग्णाना अँजिओप्लास्टीसाठी प्रतीक्षा करावी लागत होती. आता ही गैरसोय दूर होणार आहे. दुसरी कॅथलॅब लवकरच रुग्णसेवेत दाखल होईल. 

जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून ६ कोटी १५ लाख रुपये २०२०-२१ या वर्षात मंजूर झाले. कॅथलॅब यंत्र घेण्यावर खर्च हा निधी खर्च करण्यात येईल. नुकतेच विभागप्रमुखांच्या बैठकीत या विषयावर एकमत झाले. लवकरच हाफकिनकडून या यंत्राची खरेदी प्रक्रिया पूर्ण होईल. ज्येष्ठ हृदयविकारतज्ज्ञ डॉ. मुकुंद देशपांडे, विभागप्रमुख डॉ. प्रदीप देशमुख, सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील वाशिमकर यांच्यासह या विभागातील प्रत्येकाने अधिष्ठातांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

सुपरमध्ये १९९७ पासून आजतागायत सुमारे ४० हजारांवर गरीब रुग्णांच्या हृदयावर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करण्यात आली आहेत. गरिबांच्या हृदयावरील शस्त्रक्रिया सातत्याने सुरू आहेत. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून सुपर स्पेशालिटीच्या हृदयरोग विभागात सुमारे ४ कोटी ८० लाख रुपये खर्च करून नवीन कॅथलॅब लावली आहे. एफपीडी, एफएफआर, आयव्हीयूएससारख्या गुणात्मक बदलातून सुपरचा हृदय विभाग ठणठणीत झाला आहे. इमर्जन्सी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीचे फायदे गरीब रुग्णांना होत आहेत. 

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रामुख्याने गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णांची गर्दी असल्याने उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागते. मात्र, आता नवीन कॅथलॅब यंत्र लावण्यात येत आहे. सुपरमध्ये आता दोन कॅथलॅब होतील. यामुळे अधिक क्षमतेने हृदयविकाराच्या रुग्णांना लाभ मिळणार आहे. येत्या मार्च ते एप्रिलमध्ये हे यंत्र सुरू होईल. हृदयविकाराच्या रुग्णांना अद्यावत उपचार मिळतील तसेच निवासी डॉक्टरांना हृदयाशी संबंधित प्रात्यक्षिकाची संधी मिळेल. 
- डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government : महामंडळांसाठी तीन पक्षांच्या फॉर्म्युल्यावर मुंबईत चर्चा; कोणाला कोणते महामंडळ मिळणार?, नेत्यांकडून 'वेट ॲण्ड वॉच'ची भूमिका

'इथे माणसाचं जगणं...' अशोक सराफ आणि निवेदिता यांचा मुलगा परदेशात का राहतो? अनिकेतने पालकांना दिलं 'हे' मोठं कारण!

सासूच्या अंत्यसंस्कारावेळी जावयावर मगरीचा हल्ला, डोकं धरलं अन् ओढत नदीत खोलवर नेलं

Pune Crime: 'कॅफे ३६०'त पार्टीशन अन् पडदे लावून तरुण-तरुणींची 'सोय'; पुण्यातील कारवाईने खळबळ

संख्याबळ ३, तरीही लढणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक; केरळात भाजपने उमेदवार केला जाहीर

SCROLL FOR NEXT