second phase of MP Cultural between 19th to 24th March mp festival nitin gadakri nagpur sakal
नागपूर

‘खासदार सांस्‍कृतिक’चा दुसरा टप्‍पा १९ ते २४ मार्च दरम्‍यान; दयाशंकर तिवारी

केंद्रीय मंत्री खासदार नितीन गडकरी यांच्‍या इच्‍छेनुसार हा महोत्सव होणार आहे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : खासदार सांस्‍कृतिक’ महोत्सवातील शेवटचे दोन कार्यक्रम कोरोनामुळे स्थगित करण्यात आले होते. आता कोविडचे सावट पसरल्याने दुसऱ्या टप्‍प्यातील कार्यक्रमासह महोत्‍सवाचा दुसरा टप्‍पा १९ ते २४ मार्च दरम्‍यान साजरा करण्‍यात येईल, असे माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली. केंद्रीय मंत्री खासदार नितीन गडकरी यांच्‍या इच्‍छेनुसार हा महोत्सव होणार आहे.

ईश्वर देशमुख कॉलेज ग्राउंडमध्‍ये गुरुवारी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्‍या कार्यालयाचे उद्‍घाटन महापौर दयाशंकर तिवारी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. दुसऱ्या टप्‍प्‍यात या दोन मोठ्या कलावंतांसह सुनिधी चव्‍हाण, जावेद अली, साईराम अय्यर यांच्‍यासारखे मोठे गायक, सुरेंद्र शर्मा यांच्‍यासह इतर लोकप्रिय व्‍यंग कवी सहभागी होणार आहे.तसेच आयोजन स्‍थळाचे भूमिपूजनदेखील मान्‍यवरांच्‍या हस्ते करण्‍यात आले.

याप्रसंगी आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्‍यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्‍य बाळ कुळकर्णी, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, किशोर पाटील, स‍ुनिल मित्रा यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती. प्रास्‍ताविकातून प्रा. राजेश बांगडी यांनी महोत्‍सवाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र दस्‍तुरे यांनी केले.

महोत्‍सवाच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यात गायक व संगीतकार शंकर महादेवन व अभिनेत्री नृत्‍यांगना हेमामालिनी यांचा कार्यक्रम सरकारी निर्बंधामुळे होऊ शकला नव्‍हता. त्‍यामुळे तरुणाईमध्‍ये नाराजी होती.

-प्रा. अनिल सोले, अध्यक्ष, आयोजन समिती, खासदार सांस्कृतिक महोत्सव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT