CM Eknath Shinde sakal
नागपूर

CM Eknath Shinde : "सीएम साहेबांचा दरवाजा बंद ? " मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने चक्क आमदाराला नाकारला प्रवेश !

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आलेल्या भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना सुरक्षा रक्षकांनी प्रवेश नाकारल्याने त्यांना परत जावे लागले. या घटनेमुळे नाराजीची चर्चा झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुक्रवारी वर्धा दौरा असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह विविध मंत्री नागपुरात आहेत. रामगिरी निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्कामी असून काल सांयकाळी त्यांना भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर भेटण्यासाठी आले असता, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षारक्षकांनी प्रवेश नाकारल्याची माहिती समोर आली. त्यामुळे भोंडेकर आल्यापावली परतले.

पंतप्रधानाचा दौरा असल्याने मुख्यमंत्री काल सायंकाळी नागपुरात आले. यावेळी त्यांनी पक्षातील विविध नेत्याची भेट घेतली. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली. यादरम्यान रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर रामगिरीवर आले. मात्र, त्यांना सुरक्षारक्षकांनी प्रवेश नाकारला. यावेळी त्यांच्या नावाची चिठ्ठीही मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली. मात्र, त्यानंतरही त्यांना आत न बोलाविले नाही. दरम्यान याबाबत त्यांनी ‘सीएम साहेबांनी दरवाजा बंद केल्याने एन्ट्री दिली नाही’ अशी प्रतिक्रिया देत, आल्यापावली परतले.

दरम्यान या प्रकाराची परिसरात एकच चर्चा रंगली. अपक्ष म्हणून निवडुन आल्यावर युती सरकार होताच, त्यांनी शिंदे गटाला पाठींबा दिला होता. मात्र, या प्रकाराने त्यांच्यामध्ये नाराजी असल्याची चर्चा परिसरात होती. दरम्यान काही वेळाने पुन्हा त्यांना बोलाविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT