नागपूर

सुनील केदार संतप्त; पोलिस ठाण्यातून तक्रार गायब

राजेश प्रायकर

नागपूर : सुरक्षा ठेव घोटाळ्यात जिल्हा परिषदेच्या वतीने तीन तक्रारी करण्यात आल्या. यातील एका तक्रारीवर गुन्हा दाखल झाला. पाणीपुरवठा विभागाची तक्रार पोलिस ठाण्यातून गायब असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यापूर्वी लघुसिंचन विभागाने केलेली तक्रारही गायब झाली होती. पोलिस ठाण्यातून तक्रार गायब होत असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंका व्यक्त करीत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी पोलिस विभागाला फैलावर घेतले व कारवाईचे निर्देश दिले.

सुरक्षा ठेव घोटाळ्यामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा डागाळत आहे. याप्रकरणी मंत्री केदारांनी रविभवन येथे बैठक आयोजित केली होती. बैठकीला अध्यक्ष रश्मी बर्वे, माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सीईओ योगेश कुंभेजकर, अतिरिक्त सीईओ डॉ. कमलकिशोर फुटाणे, कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर, संजीव हेमके, रमेश गुप्ता, डीसीपी विनिता शाहू, सदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चौधरी, सुरक्षा ठेव घोटाळ्याचे तपास अधिकारी महिपाळे उपस्थित होते.

सुरक्षा ठेव घोटाळ्यातील कंत्राटदार आरोपीवर कारवाई होत नसून जिल्हा परिषदेत त्याचा मुक्त संचार असल्याच्या प्रकारावर पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी नाराजी व्यक्त करीत पोलिस व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. आरोपीला जामीन नसताना जिल्हा परिषदेसह इतर ठिकाणचा त्याचा वावर लाजीरवाणा असल्याचे ते म्हणाले. एखाद्या आरोपीला अशाप्रकारे अभय देणे खपवून घेतले जाणार नाही. यावर डीसीपी शाहू यांनी आपण याप्रकरणी लक्ष घालून आरोपीला तत्काळ अटक करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

हेमकेंची होणार उचलबांगडी

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव हेमके यांनी कोणताही पाठपुरावा केला नाही. तक्रार गायब असताना त्यांनी दुसरी प्रत दिली नाही. काही ठिकाणी नळ योजनेचे काम पूर्ण होण्यापूर्वीच ग्रामपंचायतींना हस्तांतरित करून हेमके यांनी कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचे काम केले. हेमके यांच्या कार्यप्रणालीवर केदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांची उचलबांगडी होणार शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT