Pranali Dahat Sakal
नागपूर

Nagpur Crime : प्रेमविवाहाला फक्त ६ महिने झाले होते तरी सुरक्षारक्षकाने संशयावरून केला पत्नीचा खून

वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आंबेडकरनगरात सुरक्षारक्षक असलेल्या पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, गळा चिरून निर्घृण खून केला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर, वाडी - वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आंबेडकरनगरात सुरक्षारक्षक असलेल्या पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत, गळा चिरून निर्घृण खून केला. ही घटना रविवारी उघडकीस आली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी पतीला अटक केली.

प्रणाली ललित दहाट (वय ३४) असे मृत पत्नीचे नाव आहे. ललित रामदास दहाट (वय ३८) असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित दहाट हा परिसरातील शिकारा बारमध्ये सुरक्षारक्षक होता. प्रणाली आणि ललित या दोघांनीही आपल्या पहिल्या पती आणि पत्नीशी घटस्फोट घेतला आहे.

दोघांचेही एकमेकांवर प्रेम असल्याने त्यांनी सहा महिन्यांपूर्वी त्यांनी मंदिरात लग्न केले. मात्र, लग्नानंतर काही दिवसात ललित हा प्रणालीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यामुळे त्यांची भांडणेही व्हायची. दरम्यान तो पत्नीला मारहाण करायचा. २५ ऑगस्टला प्रणाली माहेरी वर्धा येथे गेली. रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ती वर्धेहून नागपुरात आली.

रहाटे कॉलनी चौकात उतरली. ललित हा तिला घ्यायला गेला. ८.३० वाजताच्या सुमारास तो घरी आला. घरी परतल्यानंतर दोघांत वाद झाला. रागाचा भारात ललितने धारदार शस्त्राने गळा चिरून प्रणालीची हत्या केली. घराला कुलूप लावून ललित पसार झाला.

पसार झाल्यानंतर ललितने नातेवाईक व एका पोलिस मित्राच्या मोबाइलवर संपर्क साधून प्रणालीचा खून केल्याची माहिती दिली. पोलिस मित्राने वाडी पोलिसांना कळविले. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घरीजवळ पोहोचला.

पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, प्रणालीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. पोलिसांनी तत्काळ मृतदेह मेयोत रवाना केला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करीत, पोलिसांनी ललितचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही तासातच त्याला पोलिसांनी वाडी परिसरातून अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT