कोदामेंढी : तलाठी आणि ग्रामस्थांनी पकडलेला तांदूळ.  
नागपूर

खर्च भागविण्यासाठी लाभार्थ्यांनी विकले काय, ते पहाच !

सकाळ वृत्तसेवा

कोदामेंढी (जि.नागपूर)  :  शासनामार्फत रेशन कार्डधारकांना प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत वाटप केले जात आहे. कार्डधारकांना पूर्वी तीन रुपये किलो तांदूळ आणि दोन रुपये किलो दराने गहू वाटप करण्यात आले. सध्या बऱ्यांच लोकांच्या हाताला काम नसल्याने, तेलमिठाची गरज कुठून भागवावी अशा प्रश्न निर्माण झाल्याने लाभार्थी ती गरज भागविण्यासाठी रेशनचे धान्य व्यापाऱ्यांना विकत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

तांदळासह ट्रॅक्‍टर जप्त
नजीकच्या तांडा येथे रेशनचा तांदूळ लाभार्थी व्यापाऱ्यांना विकत असल्याने खळबळ माजली. ग्रामस्थांनी याबाबत तलाठी मुकेश मदनकर यांना सूचना दिली. माहिती मिळताच तलाठी मदनकर यांनी तांडा गाव गाठले. यावेळी व्यापारी लक्ष्मण रूपचंद भिवगडे (रा. धर्मापुरी) हे गावात फिरून लोकांचे रेशनचे तांदूळ घेताना आढळून आले. व्यापारी मदनकर यांनी आठ ते दहा लोकांकडून खरेदी केलेल्या तीन क्‍विंटल तांदूळ आढळून आले. हे तांदूळ स्वस्त धान्य दुकानातील असल्याचा संशयावरून तांदूळ वाहून नेत असलेले ट्रॅक्‍टर जप्त करण्यात आले. त्यामध्ये सहा तांदळाच्या चुंगडी होत्या. याबाबतची सूचना अरोली पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार विवेक सोनवणे यांनी घटनास्थळ गाठून ट्रॅक्‍टर पोलिस ठाण्यात जमा केले, तर तांदळाच्या चुंगड्या गोदामात सुरक्षित ठेवल्या. मंगरवारला शासकीय सुटी असल्याची संधी साधून व्यापाऱ्यांनी तांदूळ घेण्याची युक्ती साधली. मात्र, ती गावातील काही सुजाण नागरिकांमुळे फसली.

गहू, तांदूळ पाण्यात भिजवून खायचा का?
सध्या बिकट परिस्थितीचा सामना सुरू आहे. शासनामार्फत तोंडाला पाने पुसण्यागत मदत म्हणजे तांदूळ आणि गहू वाटप केल्या जात आहे. बऱ्यांच लोकांचे कामधंदे बंद असल्याने रोजची चूल पेटविणे आणि तेलमिठाचा मोठा यक्षप्रश्न उभा आहे. तांदूळ आणि गहू पाण्यात भिजवून खावे की काय, त्यामुळे परिस्थिती बघता आणि तेलमिठासाठी तांदूळ विकत असल्याचे काही सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT