senior citizens are excited to take corona vaccine in Nagpur  
नागपूर

उपराजधानीत कोरोना लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांत उत्साह; पहिल्याच दिवशी ४४० जणांनी घेतली लस 

राजेश प्रायकर

नागपूर : आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्करनंतर आजपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरवात झाली असून ज्येष्ठ नागरिक लस घेण्यासाठी उत्साहात केंद्रावर पोहोचले. पहिल्याच दिवशी ४१७ ज्येष्ठ नागरिकांसह ४५ ते ६० वयोगटातील २३ जणांनी आज कोरोना लस घेतली. शहरातील ११ लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. परंतु सहाच केंद्रावर ज्येष्ठ नागरिक पोहोचले.

राज्य सरकारने आजपासून ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत लसीकरणाला सुरवात केली. महापालिकेनेही शहरातील पाचपावली येथील दोन केंद्र, मेडिकलमधील दोन केंद्र, मेयोतील दोन केंद्र, झिंगाबाई टाकळी येथील पोलिस रुग्णालय, गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय, इमामवाडा येथील आयसोलेशन हॉस्पिटल, एम्स, ईएसआयएस हॉस्पिटल केंद्रावर आजपासून ज्येष्ठ नागरिक तसेच गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले. 

पहिल्याच दिवशी एकूण ४४० जणांनी लस घेण्यास उत्सुकता दाखवली. अकरा केंद्रापैकी सहा केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांनी तर चार केंद्रावर ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस घेतली. अनेकजण घरातील कुटुंबासह केंद्रावर पोहोचले. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रतीक्षा कक्ष असून तेथे त्यांच्या नावाची नोंदणी करण्यात आली. आधारकार्ड तसेच जन्म तारखेची नोंद असलेली कागदपत्रे घेऊनच ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण केंद्र गाठले. मेडिकलमध्ये मनपाचे सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार (वय ५१), कपिल पवार (वय ७२), नामदेव मेश्राम (वय ६५), काकाजी गायकवाड (वय ५३), सरीता ताटे (वय ७०), सुशील जयस्वाल (वय ७५) यांच्यासह अन्य ज्येष्ठ आणि गंभीर आजार असलेल्यांनी लस घेतली.

महापौर, आयुक्तांनी केली पाहणी

महापौर दयाशंकर तिवारी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) तर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) तसेच पाचपावली सूतिकागृहामध्ये ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत असलेल्या कोरोना लसीकरण केंद्रांची पाहणी केली. महापौर तिवारी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दोन्ही लसीकरण केंद्रातील लसीकरण लाभार्थ्यांशी संवाद साधला.

काळजी घेण्याचे आवाहन

शासनाची लसीकरणाची मोहिम अंतिम व्यक्तीला लस मिळेपर्यंत सुरू राहणार असल्याने गर्दी करू नये, असे आवाहन महापौरांनी केले. शहरातील ६० वर्षापेक्षा अधिक आणि ४५ वर्षावरील ज्यांना गंभीर आजार आहेत अशा नागरिकांना कोरोना लस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले. लसीकरणासाठी येताना काळजी घेण्याचा सल्लाही महापौर व आयुक्तांनी दिला.

तांत्रिक बिघाडामुळे लसीकरणास विलंब

मेयो रुग्णालयात काही तांत्रिक बिघाडामुळे नोंदणी करण्यासाठी विलंब झाला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागली. याबाबत काहींनी आयुक्तांकडे तक्रार केली. आयुक्तांनी लगेच मेयो रुग्णालयातील लसीकरण केंद्र गाठले. त्यांनी आढावा घेतला. ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुलभ होण्यासाठी तांत्रिक बिघाडात दुरुस्ती करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT