Nagpur News sakal
नागपूर

Nagpur News : ज्येष्ठ नागरिक मोफत ‘एमआरआय’पासून वंचित ;शासनाच्या घोषणांचा पाऊस फसवा

: ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी व उपचारांसाठी ''जीवेत शरद शतम्'' सारख्या आरोग्यदायी योजनांसह महात्मा फुले जनआरोग्य आणि आभापर्यंतच्या योजनांचा गाजावाजा करून पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत होतात, असा दावा केला जातो.

केवल जीवनतारे ः @kewalsakal

नागपूर : ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी व उपचारांसाठी ''जीवेत शरद शतम्'' सारख्या आरोग्यदायी योजनांसह महात्मा फुले जनआरोग्य आणि आभापर्यंतच्या योजनांचा गाजावाजा करून पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत होतात, असा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात वास्तव निराळेच आहे, उपराजधानीतील मेडिकल आणि मेडिकलमध्ये एमआरआरआय तपासणी मोफत होत नसून अडीच हजार रुपये शुल्क भरल्यानंतरच वृद्धांचा एमआरआय काढला जातो. यामुळे उपचाराला आलेले गरीब वृद्ध आल्यापावली परत जात असल्याचे विदारक वास्तव समोर आले.

खासगीतील उपचार गरिबांना परवडत नाही. मेडिकल, मेयोत दररोज सुमारे पाचशेवर ज्येष्ठ रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात नोंद होते. यातील काही अत्यवस्थ रुग्णांना डॉक्टर एमआरआय तपासणीचा सल्ला देतात. अचानक अपघात झाल्यानंतर डोक्याला किंवा इतर गंभीर जखमी होणे, माईल्ड कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट (कोणत्याही घटनेचे स्मरण न होणे), फाल ( वारंवार पडणे), डिमेन्शिया (स्मृतिभ्रंश) अशा आजारांवर एमआआरआयचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र यासाठी त्यांना अडीच हजार रुपये शुल्क द्यावे लागत आहे.

अनाथा नाहीत बीपीएल...

मेडिकल-मेयोत रस्त्यावर सापडलेल्या निराधारांना तसेच अनाथ आश्रमातील मुलांनाही एमआरआयसाठी शुल्क भरावे लागते.

अशा रुग्णाना कोणतेही नातेवाईक नसताना बीपीएल संवर्गात मोडत नसल्याचे सांगून मेडिकलमध्ये त्यांची बोळवण केली जाते. मध्यवर्ती कारागृहातून आणलेल्या बंदिवानांनाही शुल्क द्यावे लागत असल्याची माहिती पुढे आली आहे.

वर्षभरात स्वातंत्र्य सैनिकांचा एमआरआय नाही

नागपूरमध्ये सुमारे पाच लाखांवर ज्येष्ठ नागरिक आहेत. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीनुसार ३४४ स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्यांची एमआरआय तपासणी मोफत होते. त्यांच्यासाठी ही व्यवस्था असणे यात गैर नाही. मात्र, राज्यात व देशात स्वातंत्र सैनिकांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे मेडिकलमध्ये अनेक वर्षांत बोटावर मोजण्या एवढय़ाच स्वातंत्र्य सैनिकांची तपासणी झाली आहे. वर्षभरात एकानेही याचा लाभ घेतला नसल्याची माहिती पुढे आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावे लक्ष !

खणिकर्म महामंडळासह इतर संस्थांनी दिलेल्या देणगीतून मेडिकलमध्ये ‘एमआरआय’ उपकरण दिले होते. याद्वारे ज्येष्ठांसह अनाथ मुलांनाही मोफत तपासणी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीकडून करोडोंच्या यंत्र खरेदीसाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निधी मिळतो. यामुळे अशा वंचित घटकांची तपासणी मोफत व्हावी, अशी चर्चा मेडिकल वर्तुळात आहे. मेडिकल आणि मेयोमध्ये एमआरआय निदानासाठी वेगवेगळे नियम आहेत. २०१७ पासून मेडिकलमध्ये बीपीएलमधील रुग्णांचा एमआरआय मोफत होतो. मात्र मेयो येथे दारिद्य्ररेषेंतंर्गत (बीपीएल) यादीतील रुग्णांना शुल्क भरावे लागते. मेयो प्रशासनाने मेडिकलमध्ये कोणत्या आधारे बीपीएल रुग्णांचे शुल्क माफ केले जात आहे, याची शहानिशा तीन वर्षांत न करता गरिबांकडून थेट एमआरआयसाठी अवैधरित्या शुल्क वसुल करीत आहे, याकडे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी सेवा फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे.

वर्षभरात स्वातंत्र्य सैनिकांचा एमआरआय नाही

नागपूरमध्ये सुमारे पाच लाखांवर ज्येष्ठ नागरिक आहेत. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीनुसार ३४४ स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्यांची एमआरआय तपासणी मोफत होते. त्यांच्यासाठी ही व्यवस्था असणे यात गैर नाही. मात्र, राज्यात व देशात स्वातंत्र सैनिकांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे मेडिकलमध्ये अनेक वर्षांत बोटावर मोजण्या एवढय़ाच स्वातंत्र्य सैनिकांची तपासणी झाली आहे. वर्षभरात एकानेही याचा लाभ घेतला नसल्याची माहिती पुढे आली आहे.

केस स्टडी...रुग्णांना आलेले अनुभव

एक : साठी ओलांडलेली महिला म्हणाली, धुणीभांडी करणारे हात आहेत, साहेब. मालकीणबाईच्या घरी जाताना पडले. हातात पैसा नसल्याने मेडिकल गाठले. डॉक्‍टरांनी एमआरआय सांगितले. परंतु येथे २२०० रुपये भरा असे सांगितले. पैसेच नसल्याने लेकाने घरी परत नेले. असह्य वेदना सहन करीत उपचाराशिवाय परत जाणे गरिबांच्या नशिबी असल्याची भावना ज्येष्ठ महिलेने व्यक्त केली.

दोन : सत्तरीतील ज्येष्ठ नागरिक म्हणाले, वर्षभरापासून डोकं दुखत होते. मेयोतील डॉक्‍टरांना दाखवले. पहिल्या भेटीत उपचार झाले. परंतु, दुसऱ्यांदा आल्यानंतर एमआरआय सांगितला. ज्येष्ठ नागरिक म्हणून मोफत औषधच मिळाले, परंतु एमआरआयसाठी पैसे भरण्यास सांगितले. पैसे नव्हते. मात्र बीपीएल कार्ड होते. मेयोतील एक्स रे विभागात सांगितले, बीपीएल कार्डावर मोफत उपचार होत नाही. सांगितल्यावर मेडिकलमध्ये येऊन डॉक्टरांना दाखवले. त्यांनी एमआरआय काढण्यास सांगितले. येथे बीपीएल कार्डावर मोफत एमआरआय निघाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

SCROLL FOR NEXT