photo 
नागपूर

खामला परिसरातील ज्येष्ठ नागरिक यामुळे आहेत त्रस्त

नरेंद्र चोरे

नागपूर  : खामला परिसरातील सहकारनगर ते जयप्रकाशनगर मार्गावर दोन्ही बाजूला भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण करून भाजीबाजार व मटण मार्केट थाटले आहे. त्यामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे परिसरातील नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची मोठी अडचण होत आहे. महापालिका प्रशासनाने येथील अतिक्रमण हटवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी येथील ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

या परिसरात गेल्या 20 वर्षांपासून नियमितपणे भाजीबाजार भरतो आहे. खरेदी करण्यासाठी परिसरातील नागरिकांची सकाळी व सायंकाळच्या सुमारास मोठी गर्दी उसळते. या मार्गावर दररोज शेकडो वाहने सुसाट वेगाने धावत असतात. लहान मुलांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊन एखाद्याचा जीव जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कुणाचेही नियंत्रण नसल्यामुळे भाजीबाजार हळूहळू आपले हातपाय पसरवित आहे. बाजाराचा सर्वाधिक त्रास परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. काही जागरुक ज्येष्ठ नागरिकांनी अनेकवेळा भाजीबाजार व मटण मार्केट हटविण्याची मनपा प्रशासनाकडे मागणी केली. त्यानंतर थातुरमातुर कारवाई होते. परंतु, दुसऱ्या दिवशी पुन्हा स्थिती "जैसे थे' होते. सोमवारी या भागावर मनपाने कारवाईचा बडगा उगारला. मात्र बुधवारी पुन्हा दुकानदारांनी आपले बस्तान मांडले.

 

 *लॉकडाउनमुळे यांना बसणार रिव्हर्स किक ! सविस्तर वाचा* 
 


फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा


मार्केटमध्ये येणारे अनेक ग्राहक फिजिकल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे. केवळ ग्राहकच नव्हे, दुकानदारही मास्क घालताना दिसत नाही. त्यामुळे या भागात कोरोनाचा प्रसार वाढण्याची दाट शक्‍यता आहे.
 


येथील भाजी व मटण मार्केट कायमचे हटविण्यासंदर्भात आम्ही वेळोवेळी प्रशासनाला विनंती केली. कठोर कारवाई होत नसल्याने पसारा वाढतच चालला आहे. आमच्या मागणीचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा अशी अपेक्षा आहे.
-हुकुमचंद मिश्रिकोटकर, अध्यक्ष, सहकारनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ

 

संपादन : प्रशांत रॉय 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup Schedule : प्रतीक्षा संपली! वन डे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; India vs Pakistan सामना कधी व केव्हा; जाणून घ्या टीम इंडियाचे टाईमटेबल

HDFC Bank: एचडीएफसी बँकेला मिळाले नवे प्रमुख! अनूप बागची सांभाळणार एमडी आणि सीईओ पदाची धुरा

ICC ODI World Cup 2027 India Fixture: India vs Pakistan एकदा नव्हे, तर तीनवेळा भिडणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार...

Sugar Price Hike : साखरेचे दर पुन्हा वाढणार की कमी होणार? केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय; व्यापाऱ्यांची कोंडी होणार

Crop Panchnama Maharashtra : दुष्काळी तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे करा; ग्रामसेवक, तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तीन दिवसाच्या सुट्ट्या रद्द

SCROLL FOR NEXT