रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांची थट्टा; दीड वर्षापासून तिकीट सवलत बंद sakal
नागपूर

रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांची थट्टा; दीड वर्षापासून तिकीट सवलत बंद

कोरोना महामारीचे कारण पुढे करुन गेल्या दीड वर्षापासून बंद असलेले रेल्वेकडून मिळणारे ज्येष्ठ नागरिकांची सवलत बंद करण्यात आलेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना महामारीचे कारण पुढे करुन गेल्या दीड वर्षापासून बंद असलेले रेल्वेकडून मिळणारे ज्येष्ठ नागरिकांची सवलत बंद करण्यात आलेली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजीचा सुर पसरला आहे. रेल्वेसह शाळा, महाविद्यालये, आस्थापना असे सर्व काही सुरू झाले असताना सवलती पूर्ववत का सुरू करण्यात आल्या नाही, असा संतप्त सवाल विचारू लागले आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून ६० वर्ष असलेल्या ज्येष्ठ पुरुषांना तर ५८ वर्ष असलेल्या ज्येष्ठ महिलांना तिकीटांमध्ये सवलत लागू होती. पुरुषांना ४० टक्के तर महिलांना ५० टक्के तिकीटांमध्ये सवलत दिली जात होती. मात्र, आता ज्येष्ठ नागरिकांबरोबर इतर सवलती पात्र असलेल्या ५४ श्रेणीतील लोकांना पूर्ण शुल्क भरूनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये रेल्वे प्रशासनासह केंद्र सरकार विरोधात चांगलाच नाराजीचा सुर उमटू लागला आहे.

एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट एक्सप्रेसबरोबर इतर रेल्वे गाड्यांतून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांबरोबर इतर सवलती मिळणारे नागरिक प्रवास करीत होते. कोरोनानंतर सध्या स्पेशल, फेस्टिव्हलच्या नावावर देशात प्रवासी गाड्या चालविल्या जात आहे. मात्र, कोरोनापूर्वी ज्या सवलती रेल्वेकडून दिल्या जात होत्या. त्या सवलतीच कोरोना संक्रमण आणि लाटेच्या नावाखाली बंद करण्यात आल्या आहे. यामध्ये चार श्रेणीचे दिव्यांगजन आणि ११ श्रेणीचे रोगी आणि विद्यार्थ्यांनासोडून सर्व श्रेणीसाठी २० मार्च २०२० पासून सवलत काढण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिक तिकीट काऊंटरवर सवलत देणारे प्रमाणपत्र दाखवीत असतात. मात्र त्यांना सवलत बंद असल्याचे सांगितले जाते. बंद असलेल्या या सवलतीने आर्थिक नुकसान होत असल्याची भावना त्यांच्यामध्ये आहे. ज्येष्ठ नागरिकांना हा त्रास असूनही सवलत पुन्हा सुरू करण्यासाठी असा कोणताही प्रस्ताव नागपूर रेल्वे विभागातून बोर्डाला पाठविण्यात आला नसल्याची माहिती पुढे आली आहे.

''गेल्या दोन वर्षापासून ज्येष्ठ नागरिक कोरोनामुळे घरात कोंडलेले आहेत. त्यांना आता बाहेर फिरण्याची इच्छा आहे. देशात कोरोनाची संख्या फार कमी झाली आहे. सर्वकाही आता सुरू झाले असताना रेल्वेकडून बंद करण्यात आलेली सवलत पुन्हा सुरू करावी. ज्येष्ठ नागरिकांमध्ये याबाबत नाराजी आहे.''

- हुकूमचंद मिश्रीकोटकर, ज्येष्ठ नागरिक

''गेल्या दीड वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सवलत सध्या बंद आहे. रेल्वे बोर्डाकडून आदेश आल्यानंतर नागपूर विभागात पुन्हा सुरू होईल.''

- विजय थूल, जनसंपर्क अधिकारी व सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT