file photo 
नागपूर

ज्येष्ठ नागरिकांचा ‘विरंगुळा’च हरवलाय हो ! 

नरेंद्र चोरे

नागपूर : शहरातील विरंगुळा केंद्रे व ज्येष्ठ नागरिक मंडळे म्हणजे ज्येष्ठांसाठी आपुलकीचा आधार. सुख-दुःख ‘शेअर’करण्याचे एक हक्काचे ठिकाण. मात्र, कोरोनामुळे पाच महिन्यांपासून हे विरंगुळाचे केंद्रे कुलूपबंद आहेत. कोरोनाने प्रत्यक्ष भेटीगाठीची संधी हिरावून नेल्याने ज्येष्ठ नागरिकांची मोठी अडचण होत आहे. त्यांच्यात नैराश्येची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने केंद्रांना खुले करण्याची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. 


शहरात शंभराच्या वर ज्येष्ठ नागरिक मंडळे व विरंगुळा केंद्रे आहेत. या ठिकाणी दररोज सकाळी व संध्याकाळी शेकडो ज्येष्ठ नागरिक एकत्र होऊन वाढदिवस साजरे करतात. तसेच व्यायाम, कॅरम व बुद्धिबळासारखे खेळ आणि वर्तमानपत्र चाळून मनोरंजन करतात. एकमेकांशी संवाद साधून आपले सुख-दुःख ‘शेअर’ करतात. शिवाय आठवणीत रमतात. या विविध उपक्रमांमुळे आयुष्याच्या संध्याकाळी दोन-तीन तास सहज निघून जातात. मात्र, लॉकडाउन लागल्यापासून सर्व मंडळे व विरंगुळा केंद्रांना कुलूप लागले आहे. त्यामुळे संवाद बंद झाला. चर्चा व भेटीगाठीही बंद झाल्यात. परिणामतः ज्येष्ठांची अडचण झाली आहे. 


पाच महिन्यांपासून ज्येष्ठ नागरिकांना चार भिंतींच्या आत दिवस काढावे लागत आहे. त्यांची मानसिक कुचंबणा होत आहे. त्यामुळे केवळ व्हॉट्सॲप ग्रुप व सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ज्येष्ठांचा सध्या एकमेकांशी संपर्क सुरू आहे. अनेकांची मुले व सुना विदेशात असल्यामुळे ते एकाकी जीवन जगत आहेत. लॉकडाउनचा सर्वाधिक फटका त्यांनाच बसला आहे. काही ज्येष्ठ नागरिक मात्र याबाबतीत नशीबवान आहेत. लॉकडाउन असूनही नातवंडे व नातेवाइकांच्या गोतावळ्यात त्यांचे आयुष्य सुखात सुरू आहे. प्रशासनाने ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या अटींवर अनेकांना परवानगी दिली. तशीच ज्येष्ठ नागरिक मंडळे व विरंगुळा केंद्रांनाही हिरवा कंदील दाखवावा, अशी ज्येष्ठांनी मागणी केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने ज्येष्ठांना घराबाहेर न पडण्याचा तसेच प्रवास न करण्याचा सल्ला दिलेला आहे. 


लॉकडाउन लागल्यापासून विरंगुळा केंद्र बंद असल्यामुळे शहरातील बहुतांश ज्येष्ठ नागरिक घरांमध्ये कोंडले आहेत. त्यामुळे नैराश्य येऊन चिडचिडपणा वाढला आहे. ज्येष्ठांची मानसिक स्थिती बघता प्रशासनाने विरंगुळा केंद्र उघडे करण्याची परवानगी द्यावी. 
-हुकूमचंद मिश्रिकोटकर, अध्यक्ष, सहकारनगर विरंगुळा केंद्र. 

संपादन : मेघराज मेश्राम
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT