file image canva
नागपूर

खुशखबर! आणखी सात कंपन्या तयार करणार 'रेमडिसिव्हीर'

राजेश चरपे

नागपूर : महाराष्ट्र आणि नागपुरात कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. त्यातच रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेमडिसिव्हीर इंजेक्शनचे उत्पादन वाढविण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री मनसुख भाई मांडवीय यांना केली होती. ती मान्य करण्यात आली.

हेही वाचा - कुख्यात गुंडाच्या तब्बल सात शाळा, गुन्हेगारीच्या पैशातून उघडल्या शिक्षण संस्था

रेमडिसिव्हीर या इंजेक्शनची निर्मिती करण्यासाठी आता आणखी सात कंपन्यांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री मनसुख भाई मांडवीय यांची आज गडकरींनी दिल्लीत भेट घेतली. या इंजेवशनचे उत्पादन आता १० लाख व्हायल प्रतिमाह याप्रमाणे 7 ठिकाणी बनविण्यात येणार आहे. आतापर्यंत शहराला सात हजार १५० रेमडिसिव्हीर इंजेक्शन मिळाले आहेत. सात हजार इंजेक्शन आणखी येणार आहेत. रेमडिसिव्हीर उत्पादनाचे पेटंट चार कंपन्यांकडे आहे. या चार कंपन्या युध्दस्तरावर औषध निर्मिती करीत आहेत. पण आवश्यक तेवढा पुरवठा त्या करू शकत नाही. यासाठी पेटंटचा कायद्यातील कलम ८४ काही काळासाठी शिथिल करण्यासाठ़ी गडकरी यांनी पंतप्रधानांना पत्र पाठविले व आज प्रत्यक्ष पंतप्रधानांची भेट घेतली. हा कायदा शिथिल झाला तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे औषध तयार करणाऱ्या काही कंपन्यांना हे औषध बनविण्याची परवानगी देता येईल. यासाठीसुद्धा गडकरी यांनी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया यांच्याशीही मंगळवारी संपर्क केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

Hingoli Earthquake :हिंगोली जिल्हा भूकंपाने पुन्हा हादरला ;गडाळा, पांगरा शिंदे येथे केंद्रबिंदू; भिंतींनाही तडे

Latest Marathi News Live Update : अकोला दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री बावनकुळेंचा संवाद; पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात चौकशीचे आदेश, २० वर्षे जुन्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची फाइल पुन्हा उघडली

SCROLL FOR NEXT