file
file 
नागपूर

आकाशात काळेकुट्‌ट ढग जमताच काळजात होते धस्स...काळया आईच्या चिंतेने "त्यांचा' जीव होतो कासाविस...

मनोज खुटाटे

जलालखेडा (जि.नागपूर) : खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. मॉन्सूनपूर्व पाउस हजेरी लावत आहे. शेतीच्या मशागतीची कामेही शेतक-यांनी झपाटयाने सुरू केली आहेत. पण, त्यांच्याजवळ पैसे नसल्यामुळे खरीप हंगाम कसा कसणार, या प्रश्नात शेतकरी गुरफटला आहे. मालाला भाव नाही, पिकांचा विमा काढला; पण नुकसान झाले तरी विम्याचे नाव नाही. कापूस घ्यायला कोणी तयार नाही. अशा नानाविध कारणांमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगामावर संकटाचे ढग दिसू लागले आहेत.

हेही वाचा : "चल गं आजीबाई टुनुक, टुनुक' या शार्टफिल्मधूनकरताहेत जनजागरण

एक ना अनेक संकटं
खरीप हंगामात अतिपाऊस, रब्बीवर अवकाळी पावसाचा मारा यातून काढलेल्या शेतमालाला भाव मिळत नाही. शासन शेतकऱ्यांचा माल कासवगतीने खरेदी करीत आहे. पण, त्याच्या पैशाचा पत्ता नाही. मोठ्या प्रमाणात कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे. पण, ते घ्यायला कोणी तयार नाही. घेत आहे तर 3,800 रुपये प्रतिक्विंटल भावाने. शासकीय खरेदी संथ सुरू असल्याने नरखेड तालुक्‍यात नोंदणी केलेल्या सहा हजार शेतकऱ्यांचा कापूस कधी घेणे होईल, याचा थांगपत्ता नाही. खिशातील पैसे देऊन पीकविमा काढला व पिकांचे नुकसान झाले तरी विम्याची रक्कम मिळाली नाही. अशा नानाविध संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या खरीप हंगामाची चिंता सतावत आहे.
हेही वाचा : ऐका हो ऐका, येथे चारली जातात जनावरांना चक्‍क वांगी, वाचा काय आहे कारण...
 

बैलबाजार बंदमुळे समस्या
लॉकडाऊनमुळे बैलबाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे बैल घेण्या व विकण्यासाठी जागा नाही. उन्हाळा लागला की, मोठ्या प्रमाणात शेतकरी त्यांचे पशुधन विकून पैसे घेतात व ते शेतीत लावतात. तर काही शेतकरी हंगाम कसण्यासाठी बैलजोडी घेतात. पण, हे सर्व व्यवहार ही बंद आहे.

पिकांवर फिरले रोटावेटर
सध्या काही शेतकऱ्यांच्या शेतात कापूस आहे. पण, कापसाचे भाव कमी झाल्यामुळे वेचणीचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी शेतातील कापूस वेचणे टाळत आहे. आज कापूस वेचणीचा खर्च 30 रुपये प्रतिकिलो व भाव 38 रुपये प्रतिकिलो, यामुळे शेतकरी शेतात कापूस असतानादेखील कपाशीच्या पिकावर रोटावेटर चालवीत आहेत. याचबरोबर पीक कर्जदेखील मिळण्यास त्याला अडचणी होत आहे. पीककर्जासाठी लागणारी कागदपत्रे तलाठी गावात येत नसल्यामुळे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर खरीप हंगामासाठी निधी गोळा करण्याचे संकट उभे राहिले आहे.

खरीप हंगाम कसा करावा?
कोरोना व्हायरस जसा घातक ठरत आहे. तसेच शासनाचे निकषही शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहेत. शेतकऱ्यांजवळ पैसे नाही. त्याच्याजवळ असलेल्या शेतमालाला भाव नाही. तसेच बैलबाजारही बंद आहे. यामुळे येणारा खरीप हंगाम शेतकऱ्यांनी कसा करावा, याचा विचार शासनाने करणे आवश्‍यक आहे.
-बबनराव लोहे
सभापती, बाजार समिती, नरखेड

शेतमालाचे पैसे त्वरित देउन केंद्र सुरू करावे
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. पण, खरेदी केंद्रे कमी असल्यामुळे व खरेदी संथ गतीने सुरू असल्यामुळे अडचणी येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे शेतमालाचे पैसे त्वरित शेतकऱ्यांना देऊन कापूस खरेदी केंद्रे सुरू करावे.
-राजेंद्र हरणे
जिल्हाप्रमुख, शिवसेना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT