seventh accused arrested in killing case Archana Puttewar three days police custody Sakal
नागपूर

Nagpur Crime : सुपारी किलिंगप्रकरणी सातव्या आरोपीला अटक; अर्चना पुट्टेवारला तीन दिवसांची कोठडी

अर्चना यांनी सहा महिन्यापूर्वीच सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांना मारण्याचा कट आखला होता.

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : सुपारी देत, ‘हिट ॲण्ड रन’च्या माध्यमातून सासऱ्याचा खून केल्याप्रकरणी अर्चना पुट्टेवारच्या आणखी एका साथीदाराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दुसरीकडे कारागृहात असलेल्या अर्चना पुट्टेवार (वय ५३) हिची न्यायालयातून तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळविली.

संकेत हिरामण घोडमारे (वय २३, रा. जुना बगडंगज) असे सातव्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आतापर्यंत अर्चना पुट्टेवार यांच्यासह प्रशांत पार्लेवार, नीरज निमजे (वय ३२) व सचिन धार्मिक (वय ३०),

सार्थक बागडे, अर्चना यांची खासगी सचिव पायल नागेश्‍वर यांना अटक केली. दरम्यान अपघात करताना, कारमध्ये त्यांच्यासोबत संकेत घोडमारेही उपस्थित असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, त्याला पोलिसांनी अटक केली.

अर्चना यांनी सहा महिन्यापूर्वीच सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांना मारण्याचा कट आखला होता. त्यातून त्यांनी दोनदा त्यांच्यावर हल्लाही केला होता. त्यात अटक केल्यावर तीनच दिवसात अर्चना पुट्टेवार यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते.

मात्र, सार्थक बागडे याला दोन दिवसांपूर्वी अटक केल्यावर त्याचे आणि तिचे संबंध असल्याने अर्चना पुट्टेवार यांना विचारपूस करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्चना यांच्या कोठडीसाठी अर्ज केला होता. आज त्यांना न्यायालयात हजर केल्यावर त्यांची पुन्हा तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT