corona patient 
नागपूर

नागपुरात आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू, काळजी घ्या...

सकाळवृत्तसेवा

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) उपचारासाठी दाखल असलेल्या सत्तर वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला. उपराजधानीत कोरोनाच्या विषाणूमुळे झालेला हा दुसरा मृत्यू असून यामुळे प्रशासन खळबळून जागे झाले आहे. सध्या शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 133 आहे. तर मृतांचा आकडा दोन झाला आहे. 


उपराजधानीत 5 एप्रिल रोजी 68 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. यानंतर तब्बल 25 दिवसानंतर दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली. मोमीनपुरा येथील रहिवासी असून त्याला मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. संपर्कातून या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली होती.

समुदाय प्रादुर्भावाने उपराजधानीला धक्का 
विशेष बाब अशी की, नागपुरातील कोरोनाच्या पहिला बळी ठरला होता त्याला तसेच बुधवारी झालेल्या दुसऱ्या कोरोनाच्या बाधेने दगावलेल्या रुग्णाला कोणत्याही विदेशी किंवा इतर शहरातील प्रवासाची पार्श्वभूमी नव्हती. शिवाय मरकजमधील कार्यक्रमातही गेलेला नाही. त्यामुळे दोन्ही मृत्यू हे समुदाय प्रादुर्भावाचे बळी ठरले, असे म्हणता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT